व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sanjay Kute : जबाबदाऱ्या वाढल्या; पण कुटेंना बळ की सत्तेपासून लांब ठेवले?

Sanjay Kute : जबाबदाऱ्या वाढल्या; पण कुटेंना बळ की सत्तेपासून लांब ठेवले?

Sanjay Kute appointed as State General Secretary of BJP : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बदल

Buldhana भाजपच्या संघटनात्मक राजकारणात आमदार डॉ. संजय कुटे यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. पक्ष संघटनेतील सातत्यपूर्ण, शिस्तबद्ध आणि प्रभावी कामगिरीची दखल घेत भाजपने काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर प्रदेश सरचिटणीसपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविली. संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांशी मजबूत संवाद आणि निवडणूक व्यवस्थापनातील अनुभव या गुणांच्या जोरावर त्यांची या पदासाठी निवड झाल्याचे सांगितले जात असले, तरी या निर्णयामागे केवळ कौशल्य नव्हे तर सूक्ष्म राजकीय समीकरणांचाही विचार झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

प्रदेश सरचिटणीसपदानंतर लगेचच कुटे यांच्याकडे किसान मोर्चाच्या प्रभारीपदाची अतिरिक्त धुरा सोपविण्यात आली. अल्पावधीत सलग दोन प्रभावी जबाबदाऱ्या मिळाल्याने पक्ष नेतृत्वाचा त्यांच्यावर असलेला वाढता विश्वास स्पष्ट होत असला, तरी या घडामोडींना केवळ संघटनात्मक बढती म्हणून पाहिले जात नाही. उलट, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि निवडणूकपूर्व तयारीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण व शेतकरी मतदारांमध्ये प्रभाव वाढविण्यासाठी भाजपने कुटे यांच्यावर मोठी रणनीतिक भूमिका सोपविल्याचे बोलले जात आहे.

Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांनी माफी मागितली नाही तर १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

राजकीय विश्लेषकांच्या मते, संघटनेत सातत्याने काम करणाऱ्या आणि कार्यकर्त्यांमध्ये स्वीकारार्ह चेहरा असलेल्या नेत्यांना अशा जबाबदाऱ्या दिल्या जातात. मात्र, अल्पावधीत सलग दोन महत्त्वाची पदे देणे हा केवळ गौरव नसून पक्षाच्या अंतर्गत संदेशाचाही भाग असू शकतो. एका बाजूला नेतृत्वावरचा विश्वास दाखविणे, तर दुसऱ्या बाजूला प्रभावी नेत्यांना सत्तेच्या निर्णयप्रक्रियेपासून काहीसे दूर ठेवत संघटनात अधिक गुंतवून ठेवणे, असा दुहेरी राजकीय अर्थ या निर्णयातून काढला जात आहे.

Lonar lake : लोणार सरोवर जलस्तरवाढीचा होणार उलगडा; सात सदस्यीय समितीची स्थापना

काहींच्या मते, कुटे यांना दिलेल्या या जबाबदाऱ्या त्यांच्या वाढत्या राजकीय वजनाची नोंद आहेत. विशेषतः विदर्भातील संघटन बळकटी, शेतकरी प्रश्नांवरील भूमिका आणि निवडणुकीतील व्यवस्थापन कौशल्य लक्षात घेता, पक्षाने त्यांच्यावर मोठा डाव टाकल्याचे स्पष्ट दिसते. तर काही राजकीय जाणकारांच्या मते, हीच रणनीती भविष्यातील मंत्रिमंडळ किंवा सत्तास्थानाच्या चर्चांपासून त्यांना काहीअंशी दूर ठेवण्याचा ‘सॉफ्ट साईडलाइन’ संदेशही असू शकतो.

error: Content is protected !!