congress to face internal conflicts in srujan campaign : काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानामागे’ स्थानिक गटबाजी संतुलित करण्याचा डाव?
Buldhana काँग्रेसकडून राज्यभर लोकशाही बळकटीकरण आणि संघटन मजबुतीच्या नावाखाली ‘संघटन सृजन अभियान’ राबविले जात असले, तरी या मोहिमेमागील राजकीय गणितांचीच अधिक चर्चा रंगू लागली आहे. नाराज, निष्क्रिय आणि बाजूला पडलेल्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा सक्रिय करण्याचा दावा पक्षाकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात पक्षांतर्गत समीकरणे जुळविणे आणि गटबाजीला तोलून धरण्याची धडपड सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे.
याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्याचे माजी आमदार राजेश एकडे यांच्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील सक्रिय उपस्थितीने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. स्वतःच्या जिल्ह्यातील संघटनात्मक प्रश्न आणि स्थानिक नाराजीचे मुद्दे कायम असताना थेट ठाण्यात सक्रिय होण्यामागे नेमके कोणते राजकीय सूत्र आहे, असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे.
Politics on voters list : मतदार यादीवर महायुतीतच चुरस; शिंदेसेना-भाजपमध्ये ‘मैत्रीपूर्ण स्पर्धा’!
पक्षश्रेष्ठींनी एकडे यांच्यावर विशेष जबाबदारी सोपविल्याची चर्चा असली, तरी त्यामागे स्थानिक गटबाजी नियंत्रणात ठेवण्याचा आणि आगामी निवडणुकांसाठी संघटनात्मक समीकरणे मजबूत करण्याचा डाव असल्याचे बोलले जात आहे. अंबरनाथसारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील भागात अनुभवी चेहरा पाठविण्यामागे निवडणूकपूर्व रणनीती असल्याचे जाणकारांचे मत आहे.
MSRTC : एसटीतील १७ अकार्यक्षम अधिकारी अद्याप मोकाट; चौकशी समितीचे काम संथगतीने, अभय कोणाचे?
मात्र, बुलढाणा जिल्ह्यातच संघटन अनेक ठिकाणी आव्हानात्मक स्थितीत असताना, स्थानिक नेतृत्वाला वगळून बाहेरील जबाबदारीवर भर का दिला जात आहे, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे एकडे यांची ठाण्यातील सक्रियता आणि बुलढाण्यातील वाढती खदखद आगामी राजकीय घडामोडींना नवे वळण देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.








