Uproar in the Akola Municipal Corporation meeting over the issue of extension for contractual employees : कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मुदतवाढीच्या मुद्दा, शाब्दिक चकमक पोहोचली शिविगाळीपर्यंत
Akola अकोला महापालिकेच्या स्थायी समिती सभेत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मुदतवाढीच्या मुद्द्यावरून अभूतपूर्व गोंधळ उडाला. शिंदेसेनेचे नगरसेवक सागर भारुका आणि स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक होऊन वाद अश्लील शिवीगाळपर्यंत पोहोचला. अखेर सभापती अग्रवाल यांनी भारुका यांना निलंबित करून सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश दिले.
विशेष म्हणजे, सकाळी मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत सागर भारुका यांनी विजय अग्रवाल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, “त्यांची सर्व स्वप्ने पूर्ण झाली असून आता केवळ आमदारकीचे स्वप्न बाकी आहे; ते पूर्ण करण्यासाठी आपण शिपाई म्हणूनही काम करू,” असे म्हटले होते. मात्र काही तासांतच दुपारच्या सभेत दोघांतील संबंधांमध्ये तीव्र कटुता दिसून आली.
ladki bahin yojna : लाडकी बहीण योजनेत ‘ई-केवायसी’च्या नावाखाली फसवणूक
स्थायी समितीच्या दोन सभांचे इतिवृत्त मंजुरीसाठी चर्चेला आले असताना भारुका यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्यास विरोध दर्शवित “येथे मनमानी कारभार सुरू आहे,” असा आरोप केला. त्यावर अग्रवाल यांनी “होय, आहे हुकूमशाही!” असे प्रत्युत्तर दिल्याने वादाला सुरुवात झाली. पुढे आरोप-प्रत्यारोप वाढत गेले आणि दोघांनी एकमेकांना उघड आव्हाने दिली. काही काळ सभागृह रणांगण बनले.
Monsoon forecast : यंदाचा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता
नगरसेवक व सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकारामुळे सभागृहातील महिला सदस्यांना लाजिरवाण्या प्रसंगाला सामोरे जावे लागले. गोंधळ शांत झाल्यानंतर सभा पुन्हा सुरू झाली आणि डिजिटल बोर्ड खरेदी तसेच ६५ सेवा ऑनलाइन करण्यासंबंधीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.








