व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home क्राईम Ravi Rana: अचलपूर-परतवाडा व्हिडिओ प्रकरण तापले; दोघे अटकेत

Ravi Rana: अचलपूर-परतवाडा व्हिडिओ प्रकरण तापले; दोघे अटकेत

Ravi Rana demands strict action against accused : आरोपींना कठोर शिक्षेची आमदार रवी राणा यांची मागणी,

Amravati अचलपूर आणि परतवाडा परिसरातील मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याच्या प्रकरणाने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या घटनेचा तीव्र निषेध करत आमदार रवी राणा यांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली असून, मुख्य आरोपीला जन्मठेपेची शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
रवी राणा यांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याच्यावर गंभीर आरोप करत, हिंदू मुलींना फसवून त्यांचे व्हिडिओ तयार करणे ही अत्यंत विकृत मानसिकता असल्याचे म्हटले.

“अशा नराधमांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. पोलिसांनीही कडक कारवाई करून भविष्यात कुणी असे धाडस करणार नाही, याची खबरदारी घ्यावी,” असे ते म्हणाले. उद्याच्या अचलपूर बंदलाही त्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
या प्रकरणात परतवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १९ वर्षीय अयान अहमद तनवीर अहमद याने विविध मुलींसोबत आक्षेपार्ह वर्तन करून त्यांचे १८ व्हिडिओ आणि ३९ फोटो तयार केल्याचे तपासात समोर आले आहे. हे साहित्य त्याने आणि त्याचा मित्र उजैर खान इक्बाल खान (२०) यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

Aaditya thackeray : शिवसेनेत मोठी संघटनात्मक हालचाल; आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार !

एकही पीडित मुलगी तक्रारीसाठी पुढे न आल्याने पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला. पीडितांमध्ये काही अल्पवयीन मुली असल्याचा संशय असल्याने आरोपींवर पोक्सोसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी पीडितांना निडरपणे पुढे येण्याचे आवाहन केले असून, तक्रारींची गोपनीयता राखली जाईल, असे स्पष्ट केले.

error: Content is protected !!