व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sanjay Nirupam : मीरा भाईंदरची घटना दहशतवादी कृत्यासारखीच, यामागे ‘मास्टरमाइंड’ असण्याची शक्यता

Sanjay Nirupam : मीरा भाईंदरची घटना दहशतवादी कृत्यासारखीच, यामागे ‘मास्टरमाइंड’ असण्याची शक्यता

The Mira-Bhayandar incident is akin to a terrorist act, claims Sanjay Nirupam : शिवसेना नेते संजय निरूपम यांचा खळबळजनक दावा

Nagpur मीरा भाईंदर येथे सुरक्षारक्षकांवर झालेला हल्ला ही अत्यंत दुर्दैवी घटना असून, या घटनेचे स्वरूप पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यांसारखेच आहे. ज्या पद्धतीने सुरक्षारक्षकांना धर्म विचारून कलमा वाचण्यास सांगितले गेले आणि ते न वाचता आल्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाला, हे पाहता यामागे एखादी दहशतवादी संघटना किंवा मोठा मास्टरमाइंड असण्याची दाट शक्यता आहे, असा खळबळजनक दावा शिवसेना नेते संजय निरूपम यांनी आज नागपूर येथे केला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना निरूपम यांनी मीरा भाईंदर घटनेवरून सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, हा केवळ एका माथेफिरूचा प्रकार नसून महाराष्ट्रातील शांतता भंग करण्यासाठी केले जात असलेले हे षडयंत्र वाटत आहे. ‘लव्ह जिहाद’ आणि ‘कॉर्पोरेट जिहाद’ सारखी प्रकरणे समोर येत असतानाच अशा घटना घडणे चिंताजनक आहे. महाराष्ट्र पोलीस आणि एटीएस सक्षम असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीचा पाकिस्तानातील संघटनांशी काही संबंध आहे का, याचाही तपास व्हायला हवा, अशी मागणी त्यांनी केली.

Samrt city project : मृतांच्या हक्काची जागाही सोडली नाही; दहनघाटच केला लंपास

विधान परिषदेच्या निवडणुकीवरून बोलताना संजय निरूपम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरेंची निवडणूक बिनविरोध व्हावी या चर्चेवर ते म्हणाले की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मोठा फरक आहे. पवार हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत, मात्र उद्धव ठाकरे इतकेही मोठे नाहीत की त्यांना निवडून आणण्यासाठी नऊ जागांवरच निवडणुका व्हाव्या. दरम्यान, शिवसेनेकडे दोन उमेदवार निवडून आणण्याचे संख्याबळ असून, अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या पाठिंब्यावर तिसरा उमेदवार देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य वेळी निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

BJP Shivsena Eknath Shinde : भाजपचे माजी महानगराध्यक्ष, नगरसेवक शिंदेंच्या सेनेत

मराठी भाषेबाबत सामोपचाराची भूमिका
राज्यातील टॅक्सी आणि ऑटो चालकांना मराठी सक्ती करण्याच्या मुद्द्यावर निरूपम यांनी वास्तववादी भूमिका मांडली. “महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्वांना मराठीचे ज्ञान हवेच आणि त्यांनी मराठीत संवाद साधला पाहिजे, यावर आमचे एकमत आहे. मात्र, केवळ मराठी येत नाही म्हणून कुणाचे परमिट किंवा लायसन्स रद्द करणे चुकीचे आहे. अशा टोकाच्या भूमिकेमुळे लोकांवर उपासमारीचे संकट येऊ शकते,” असे ते म्हणाले. या संदर्भात आमदार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत, ज्यांना मराठी येत नाही त्यांना प्रशिक्षण देऊन तयार करावे आणि तशी व्यवस्था निर्माण करावी, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

error: Content is protected !!