व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Legislative Elections : ना जोशी, ना तिवारी; थेट भेंडेवर बाजी; विधानपरिषदेसाठी भाजपचे...

Legislative Elections : ना जोशी, ना तिवारी; थेट भेंडेवर बाजी; विधानपरिषदेसाठी भाजपचे ‘सहकार’ धोरण!

Sanjay Bhende is candidate from Nagpur for legislative election from BJP : नागपूर भाजपमधील गटबाजीच्या चर्चांना पूर्णविराम, संघटनेतील कार्यकर्त्याला संधी

Nagpur विधान परिषदेवर कोणाची वर्णी लागते, याकडे संपूर्ण नागपूर जिल्ह्याचे लक्ष लागले होते. गेल्या अनेक दिवसांपासून माजी आमदार संदीप जोशी, ग्रामीणचे माजी अध्यक्ष डॉ. राजीव पोतदार आणि शहर भाजपचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या नावांची जोरात चर्चा सुरू होती. मात्र, ऐनवेळी भारतीय जनता पक्षाने सहकार क्षेत्राचा दांडगा अनुभव असलेले संजय भेंडे यांची उमेदवारी जाहीर करून सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे.

संजय भेंडे यांची निवड ही केवळ राजकीय नसून ती संघटनात्मक संदेश देणारी ठरली आहे. गेल्या काही वर्षांपासून नागपूर भाजपमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे दोन गट पडल्याचे चित्र राजकीय वर्तुळात रंगवले जात होते. खुद्द कार्यकर्तेही तसे दावे करत होते. भेंडे हे प्रामुख्याने गडकरी समर्थकांमध्ये गणले जात असल्याने, सध्याच्या परिस्थितीत त्यांच्या नावाचा विचार केला जाणार नाही, असे ठामपणे सांगितले जात होते. मात्र, भाजपने भेंडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून नागपुरात कोणतीही गटबाजी शिल्लक नसल्याचा आणि पक्ष एकसंघ असल्याचा कडक संदेश दिला आहे.

Parth pawar : अजित दादांच्या मृत्यूशी जोडलेल्या कंपनीच्या विमानाने पार्थ पवारांचा प्रवास !

संजय भेंडे हे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष असून सहकार आणि बँकिंग क्षेत्रात त्यांचा मोठा दबदबा आहे. अतिशय संयमी आणि मृदुभाषी नेते म्हणून त्यांची ओळख आहे. नागपूर नागरिक सहकारी बँकेचे संचालक असलेल्या भेंडे यांनी ‘एग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया’ आणि ‘विदर्भ अर्बन को-ऑप बँक्स असोसिएशन’मध्ये तज्ज्ञ संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

Maratha-Reservation And OBC certificate :मोठी राजकीय घडामोड; उद्योगमंत्री उदय सामंत यांची मनोज जरांगे यांच्याशी भेट

याशिवाय महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स (नॅफकब) आणि को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ इंडिया यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्येही त्यांनी संचालक म्हणून काम पाहिले आहे. सहकार क्षेत्रातील हा दांडगा अनुभव आणि सर्वसमावेशक चेहरा यामुळेच पक्षाने दिग्गजांना बाजूला सारत भेंडे यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!