व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Operation tiger : शिंदेंसोबत गाडीतून प्रवास; ठाकरे गटात खळबळ, उद्धव ठाकरेंचा थेट...

Operation tiger : शिंदेंसोबत गाडीतून प्रवास; ठाकरे गटात खळबळ, उद्धव ठाकरेंचा थेट फोन !

uddhav-thackeray-call-sanjay-dina-patil-eknath-shinde-car-travel-operation-tiger : महाराष्ट्रात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना पुन्हा उधाण

Mumbai : राज्याच्या राजकारणात पुन्हा संशयाचे आणि चर्चांचे वादळ उठवणारी घटना समोर आली असून ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकाच गाडीतून प्रवास केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर लगेचच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संबंधित खासदाराला फोन केल्याची माहिती समोर आल्याने या भेटीमागील राजकीय अर्थ लावण्यास सुरुवात झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय दिना पाटील यांच्या पत्नीचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला असून त्यांच्यावर मुंबईतील फोर्टीस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात गेले होते. भेटीनंतर शिंदे निघताना संजय दिना पाटील त्यांच्या गाडीत बसल्याचे दिसून आले आणि याच घटनेने राजकीय चर्चांना चांगलाच तोंड फोडले.

Mamata Banerjee : ममतांचा राजीनाम्यास नकार; ‘निकाल षड्यंत्राचा’ आरोप

या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी स्वतः संजय दिना पाटील यांना फोन करून त्यांच्या पत्नीच्या तब्येतीची विचारपूस केली तसेच अपघाताबाबत माहिती घेतली. या संभाषणाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. जरी हा संवाद वैयक्तिक सहानुभूतीचा भाग मानला जात असला तरी त्यामागे राजकीय संदेश दडलेला असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या कथित ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर या घटनेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा आधीच रंगल्या होत्या. त्यातच संजय दिना पाटील आणि एकनाथ शिंदे यांचा एकत्र प्रवास समोर आल्याने या चर्चांना पुन्हा खतपाणी मिळाले आहे.

Mamata Banerjee : ममतांचा राजीनाम्यास नकार; ‘निकाल षड्यंत्राचा’ आरोप

एकीकडे ही भेट जुने सहकारी म्हणून झाल्याचे सांगितले जात असले तरी दुसरीकडे त्यातून राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ठाकरे गटात अंतर्गत अस्वस्थता वाढण्याची चिन्हे दिसत असून पुढील काही दिवसांत या प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात नवे वळण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!