व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Buldhana Politics : महायुतीत ‘पॉवर बॅलन्स’चा प्रश्न; राष्ट्रवादी आघाडीवर, भाजप अस्वस्थ

Buldhana Politics : महायुतीत ‘पॉवर बॅलन्स’चा प्रश्न; राष्ट्रवादी आघाडीवर, भाजप अस्वस्थ

NCP gains an upper hand over BJP through the District Planning Committee : जिल्हा नियोजन समितीमुळे राष्ट्रवादी ठरतेय भाजपवर वरचढ

Buldhana जिल्ह्याच्या राजकारणात महायुतीचे एकत्रित चित्र बाहेरून दिसत असले, तरी प्रत्यक्षात सत्तेतील अंतर्गत समीकरणे बदलत असल्याची चर्चा जोर धरत आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने स्थानिक पातळीवर प्रभावी ‘पॉवर शो’ उभारल्याचे चित्र दिसत असून, त्याचा थेट परिणाम भाजपच्या संघटनात्मक आणि राजकीय हालचालींवर होत असल्याचे जाणवत आहे.

पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे असल्याने जिल्हा नियोजन समिती आणि विविध शासकीय निर्णय प्रक्रियेत त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा प्रभाव अधिक ठळकपणे दिसून येतो. निधी वाटप, विकासकामांची प्राधान्यक्रम ठरवणे आणि प्रशासकीय स्तरावर निर्णय घेणे या बाबींमध्ये राष्ट्रवादीची पकड मजबूत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. परिणामी, महायुतीतील प्रमुख पक्ष असूनही भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना अपेक्षित प्रतिनिधित्व मिळत नसल्याची भावना वाढीस लागली आहे.

Annabhau Sathe Statue : अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यासाठी ‘डफडे बजाव’, पण निर्णयाचा ठावठिकाणा नाही

भाजपच्या अंतर्गत बैठकींमध्ये या मुद्द्यावर नाराजी उघडपणे व्यक्त होत असल्याचे सांगितले जाते. “सत्तेत असूनही प्रभाव कमी” अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होत असून, काही ठिकाणी विकासकामांबाबत त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर संघटनात्मक पातळीवर असंतोष वाढत असल्याचे चित्र आहे.

ही परिस्थिती संतुलित करण्यासाठी सहपालकमंत्री म्हणून संजय सावकारे यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, त्यांच्या अपेक्षित सक्रियतेअभावी कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले नाही. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भाजपची भूमिका अधिक ठामपणे मांडली जाण्याची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Operation tiger : शिंदेंसोबत गाडीतून प्रवास; ठाकरे गटात खळबळ, उद्धव ठाकरेंचा थेट फोन !

महायुतीत बाह्य एकात्मता दिसत असली तरी अंतर्गत ‘पॉवर इक्वेशन’मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा वाढता प्रभाव आणि भाजपमधील वाढती अस्वस्थता ही आगामी राजकीय घडामोडींसाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

error: Content is protected !!