Bacchu Kadu claims he is being defamed by the opposition’s IT cell : विरोधकांच्या आयटी सेलकडून आपल्या नावावर दिशाभूल करत असल्याचा दावा
Amravati आमदार बच्चू कडू यांना लक्ष्य करणारी कथित ‘वॉर रूम’ नेमकी कोणत्या पक्षाची, या चर्चेला सध्या उधाण आले आहे. काही पक्षांच्या ‘आयटी सेल’कडून आपली जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचा गंभीर आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.
कर्जमाफीसंदर्भातील त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून त्यांना शेतकरीविरोधी दाखवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा त्यांनी केला. “सगळ्यांना कर्जमाफी नको” असे विधान आपल्या नावावर खपवून जनतेत चुकीचा संदेश पसरवण्यात आल्याचे बच्चू कडू म्हणाले.
विशेष म्हणजे, बच्चू कडू सध्या महायुतीतील ‘शिंदेसेने’चे सहयोगी मानले जातात. त्यामुळे त्यांच्याविरोधात सुरू असलेली ही कथित मोहीम नेमकी घरातीलच कुणाकडून राबवली जात आहे की विरोधकांकडून राजकीय डाव खेळला जात आहे, याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
Mahayuti plan : विरोधकांची झोप उडवणारा महायुतीचा नवा ‘पॉवर प्लॅन’
बच्चू कडू यांनी कोणत्याही पक्षाचे नाव स्पष्टपणे घेतले नसले, तरी “त्यांना व्यवस्थित बदनाम करा” असा फतवा काही ‘वॉर रूम’मधूनच निघाल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे आता बच्चू कडू या बदनामीमागील सूत्रधारांचा शोध घेणार की ही चर्चा केवळ राजकीय कुजबुज ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








