Chandrashekhar Bawankule hits back at Vijay Wadettiwar over the Mirasar issue, says he lacks proper information : निकालावर समाधानी नाही, या जमिनीसाठी शासन सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे केले स्पष्ट
Nagpur विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी मिरासार जमीन प्रकरणावरून केलेल्या आरोपांना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात जोरदार प्रत्युत्तर दिले. विजय वडेट्टीवार यांना या विषयाची पूर्ण माहिती नाही. ती जमीन राज्य सरकारचीच असून, उच्च न्यायालयाच्या निकालावर आम्ही समाधानी नाही. या जमिनीसाठी शासन आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्टपणे बजावले.
Vijay Wadettiwar : मिरा भाईंदरमधील २५४ एकर सरकारी जमीन बिल्डरांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव
वडेट्टीवारांच्या आरोपांमधील हवा काढून घेताना त्यांनी या जमिनीचे कायदेशीर स्वरूप मांडले.
बावनकुळे म्हणाले की, ही जमीन मुळात वर्ग-२ ची असून ९९९ वर्षांच्या लीजवर देण्यात आली होती. उच्च न्यायालयाने ती जमीन खाजगी कंपनीला देण्याचा निर्णय दिला असला तरी, केवळ मंजुरी मिळाल्याने कोणीही शासनाच्या जमिनीचा मालक होऊ शकत नाही. उच्च न्यायालयाने कोणत्या आधारावर हा निकाल दिला याचा आम्ही सखोल अभ्यास करत आहोत. ही जमीन खाजगी मालकाला देऊ नये ही सरकारची ठाम भूमिका असून, त्याबाबतचे सर्व पुरावे आम्ही सुप्रीम कोर्टात सादर करनार आहो.
महायुती सरकारमधील समन्वयासाठी मंत्री गटाची समिती नेमण्यात आली असून, सरकार आणि पक्ष पातळीवर प्रभावी समन्वय राखला जाईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, मराठी विषयात विद्यार्थी नापास होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. ही आपली मातृभाषा असून विद्यार्थ्यांनी त्यात यश मिळवण्यासाठी पालकांनी आणि नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.








