व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Petrol diesel price : इंधन दरवाढीचा झटका! सरकारच्या निर्णयाने पेट्रोल-डिझेल पुन्हा महाग

Petrol diesel price : इंधन दरवाढीचा झटका! सरकारच्या निर्णयाने पेट्रोल-डिझेल पुन्हा महाग

petrol-diesel-price-hike-third-time-maharashtra-modi-government-fuel-price-increase : महाराष्ट्रात सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

Mumbai : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अवघ्या आठ ते नऊ दिवसांत तिसऱ्यांदा वाढ झाल्याने देशभरात महागाईचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी देशवासियांना इंधनाचा वापर जपून करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता सलग दरवाढ होत असल्याने आगामी काळात आणखी मोठी आर्थिक झळ बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शनिवारी सकाळपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ लागू करण्यात आली असून पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ८७ पैसे तर डिझेलच्या दरात ९१ पैशांची वाढ करण्यात आली आहे.

यापूर्वी १५ मे रोजी पेट्रोलच्या दरात ३ रुपये आणि डिझेलच्या दरात ३.११ रुपयांची मोठी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर २० मे रोजी दुसऱ्यांदा दरवाढ करण्यात आली. त्या वेळी पेट्रोल ८६ पैशांनी आणि डिझेल ८३ पैशांनी महाग झाले होते. आता तिसऱ्यांदा दरवाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिक, वाहनचालक आणि व्यापारी वर्गामध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Fuel crisis : डिझेलसाठी महाराष्ट्र पेटला, इंधन टंचाईने पेरणीपूर्व मशागत ठप्प!

मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०८.४५ रुपयांवर पोहोचला असून डिझेलचा दर ९५.०२ रुपये झाला आहे. राज्यातील विविध शहरांमध्ये स्थानिक करांमुळे दरांमध्ये काही प्रमाणात फरक दिसून येत आहे. परभणीमध्ये पेट्रोल ११०.४५ रुपये आणि डिझेल ९७.०२ रुपये झाले आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल १०९.३० रुपये तर डिझेल ९५.८९ रुपये दराने विकले जात आहे. भंडाऱ्यात पेट्रोल १०९.६० रुपये आणि डिझेल ९६.१८ रुपये झाले आहे.

सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर १०९.१४ रुपये आणि डिझेल ९५.७४ रुपये झाला असून अमरावतीमध्ये पेट्रोल १०९.१५ रुपये आणि डिझेल ९५.६८ रुपये झाले आहे. वाशिममध्ये पेट्रोल १०९.७९ रुपये आणि डिझेल ९६.३९ रुपये दराने विकले जात आहे. नाशिकमध्ये पेट्रोल १०९.७१ रुपये आणि डिझेल ९६.२६ रुपये इतक्या उच्चांकी स्तरावर पोहोचले आहे. नागपूरमध्ये पेट्रोल १०८.९७ रुपये आणि डिझेल ९५.५८ रुपये झाले आहे.

Legislative Election : युवा स्वाभिमानने कसली कंबर, महायुतीकडे जागेची मागणी!

रत्नागिरीमध्ये पेट्रोलचा दर ११०.४४ रुपये आणि डिझेल ९७.०१ रुपये झाला आहे. अहिल्यानगरमध्ये पेट्रोल १०८.८७ रुपये आणि डिझेल ९५.४७ रुपये इतके दर झाले आहेत. पुण्यात पेट्रोल १०८.७६ रुपये आणि डिझेल ९४.४० रुपये दराने विकले जात आहे. अकोल्यात पेट्रोल १०९.०५ रुपये आणि डिझेल ९५.६३ रुपये इतके दर नोंदवले गेले आहेत.

इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात वाढलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्याचा थेट परिणाम भारतीय पेट्रोलियम कंपन्यांवर झाला असून कंपन्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर केंद्र सरकारने इंधन दरवाढीचा काही भार थेट नागरिकांवर टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Legislative elections : अनिल अग्रवाल यांचे दिल्ली-मुंबईत लॉबिंग; देशमुखांचाही दावा मजबूत

दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण झाल्याचे चित्र आहे. बुलढाणा, जळगाव आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा जाणवत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आगामी काळात कच्च्या तेलाच्या किंमती आणखी वाढल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आधीच महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

__

error: Content is protected !!