व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Legislative elections : अनिल अग्रवाल यांचे दिल्ली-मुंबईत लॉबिंग; देशमुखांचाही दावा मजबूत

Legislative elections : अनिल अग्रवाल यांचे दिल्ली-मुंबईत लॉबिंग; देशमुखांचाही दावा मजबूत

Congress Stakes Claim on the Amravati Seat, Gears Up Strongly for the Legislative Council Elections : अमरावतीच्या जागेवर काँग्रेसचा दावा, विधानपरिषदेसाठी जोरदार तयारी

Amravati महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची शक्यता व्यक्त होत असून, उमेदवारीसाठी इच्छुकांनी हालचाली तीव्र केल्या आहेत. काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक अनिल अग्रवाल Anil Agrawal आणि नागपूरस्थित आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ हर्षजित देशमुख Harshjit Deshmukh यांनी पक्षाकडे अधिकृत उमेदवारीची मागणी केली आहे.

दरम्यान, बाहेरून उमेदवार आणण्याऐवजी स्थानिक आणि पक्षनिष्ठ चेहऱ्यालाच संधी द्यावी, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जोर धरत आहे. त्यामुळे उमेदवारीचा मुद्दा पक्षात चर्चेचा विषय ठरला आहे. उमेदवारीच्या शर्यतीत अनिल अग्रवाल यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क वाढवत त्यांनी मुंबई आणि दिल्ली येथे भेटीगाठी सुरू केल्याचे सांगितले जात आहे.

Anil Deshmukh : विदर्भात RTO च्या नावाखाली ‘वसुली गँग’; माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे थेट परिवहन सचिवांना पत्र

दुसरीकडे, उच्चशिक्षित आणि आयटी क्षेत्रातील अनुभवाच्या जोरावर हर्षजित देशमुख यांनीही काँग्रेस हायकमांडसमोर आपला दावा मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यंदाच्या निवडणुकीत विजयासाठी काँग्रेसने स्थानिक पातळीवर प्रभाव असलेला आणि मतदारसंघाशी थेट संपर्क असलेला उमेदवार द्यावा, असा सूर स्थानिक नेत्यांमध्ये उमटत आहे.

Uddhav thackeray : बच्चू कडूंला “घरी बोलावून मंत्री केलं, तीच चूक ठरली”

मतदारसंघातील राजकीय समीकरणांचा अभ्यास करत काँग्रेसने अंतर्गत सर्वेक्षण आणि रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसकडे सुमारे १२० मतदारांचे बळ असल्याचा दावा पक्षातील सूत्रांकडून केला जात आहे. त्यात उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या मतांची जोड मिळाल्यास विजयाचा मार्ग सुकर होऊ शकतो, अशी चर्चा आहे.

महायुतीत जागावाटपावरून धुसफूस?
दुसरीकडे, महायुतीमध्ये जागावाटप आणि उमेदवारीवरून अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा रंगू लागली आहे. भाजप, शिंदे गटाची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि युवा स्वाभिमान पक्ष यांच्यातील समन्वयाचे आव्हान वाढत असल्याचे बोलले जात आहे.
महायुतीतील संभाव्य अंतर्गत नाराजीचा फायदा घेण्यासाठी काँग्रेसने पडद्यामागून रणनीती आखण्यास सुरुवात केल्याचे संकेत आहेत. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचा अधिकृत उमेदवार मैदानात उतरल्यास ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!