व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Neet paper leak case : ‘नीट’ प्रकरणातील आरोपी मोटेगावकर यांच्या कथित बेनामी...

Neet paper leak case : ‘नीट’ प्रकरणातील आरोपी मोटेगावकर यांच्या कथित बेनामी संपत्तीची चौकशी करा

Vanchit bahujan aghadi demands for property investigation of main accused in neet paper leak case: पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप; वंचित बहुजन युवा आघाडीची पोलिसांत तक्रार

Akola देशभर गाजलेल्या ‘नीट’ पेपरफूट प्रकरणातील आरोपी मोटेगावकर यांच्या अकोल्यातील कथित बेनामी संपत्तीची चौकशी करण्यात यावी तसेच शैक्षणिक संस्थेतील साहित्य व नोंदी इतरत्र हलवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या आरोपांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडी आणि महिला आघाडीने केली आहे. याबाबत सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. तक्रारीनुसार, अकोल्यातील तोष्णीवाल लेआउट परिसरातील आर.सी.सी. मोटेगावकर क्लासमधील संगणक, शैक्षणिक साहित्य, विद्यार्थ्यांच्या नोंदी आणि अन्य महत्त्वाचे रेकॉर्ड इतरत्र हलविण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मोटेगावकर यांच्याविरोधात विविध गुन्हे दाखल असून, ‘नीट’ पेपरफूट प्रकरण आणि कथित आर्थिक गैरव्यवहारांबाबत केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. अशा परिस्थितीत संभाव्य पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा संघटनेने केला आहे.

Viplav bajoria : महसूल भवनातील गोंधळ भोवला; बाजोरिया पिता-पुत्रांविरुद्ध गुन्हा दाखल

तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, सिव्हिल लाईन पोलिसांनी दोन वेळा नोटीस बजावूनही संबंधितांकडून साहित्य हलविले जात असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच, क्लासमध्ये प्रवेशासाठी भरलेली फी परत मिळत नसल्याची तक्रार काही पालकांनी केल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे.

वैष्णवी पारधी आणि राधिका माहुरी यांनी कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कार्यालय बंद असल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून पुरावे व मालमत्ता हलविण्याच्या आरोपांची पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

Farmer Loan waiver : जिल्ह्यात ५० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची शक्यता; शासनाने जाहीर केले नवे निकष

यावेळी केंद्रीय कार्यकारिणी सदस्या अरुंधती शिरसाट, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, इंजि. धीरज इंगळे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, वंदना वासनिक, दादाराव पवार, सुगत डोंगरे, आशिष रायबोले, जिया शाह, मिलिंद दामोदर, सम्राट तायडे, अक्षय राऊत, जय तायडे, आकाश जंजाळ, शुभम साऊथकार, अमोल वानखडे, साहिल बोदडे, प्रदीप इंगळे, महेंद्र शिरसाट, आनंद शिरसाट, विजय पातोडे, युवराज डोंगरे, राजेश इंगळे, राजेश बोदडे, समीर पठाण, राजदार खान, नितीन वानखडे, ज्योती खिल्लारे, किरण बोराखडे, अक्षय डोंगरे, अनिकेत शिरसाट, स्वरूप इंगोले, अंकुश बलखंडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!