व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Farmer Loan waiver : जिल्ह्यात ५० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची शक्यता; शासनाने...

Farmer Loan waiver : जिल्ह्यात ५० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची शक्यता; शासनाने जाहीर केले नवे निकष

More than 50,000 farmers in the district likely to get debt relief; government announces new eligibility criteria : दोन कर्जमाफी योजनांनंतरही हजारो शेतकरी वंचित, सुधारित अटींमुळे दिलासा

Akola राज्य शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी सुधारित अटी व निकष जाहीर केल्यानंतर अकोला जिल्ह्यातील ५० हजारांहून अधिक शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. १ एप्रिल २०१९ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत पीक कर्ज घेतलेले आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत कर्जाची परतफेड न केलेले शेतकरी या योजनेअंतर्गत लाभासाठी पात्र राहणार आहेत.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सुमारे ५० हजार ४०४ खातेदार शेतकरी सुमारे ६४९ कोटी रुपयांच्या थकबाकीसह या योजनेच्या कक्षेत येण्याची शक्यता आहे. यापूर्वी राज्यात राबविण्यात आलेल्या दोन कर्जमाफी योजनांमध्ये विविध निकषांमुळे अनेक शेतकरी वंचित राहिले होते. नव्याने जाहीर झालेल्या निकषांमुळे अशा शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Targets bjp : महायुतीत पुन्हा धुसफूस; ‘मित्रपक्षासारखी वागणूक मिळत नसल्याची खंत

अवकाळी पावसामुळे वाढले संकट
जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याने हजारो शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जाची नियमित परतफेड करू शकले नाहीत.

शासनाकडून माहिती संकलन सुरू
शासनाने कर्जमाफीबाबत आदेश जारी केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हा अग्रणी बँक, जिल्हा उपनिबंधक कार्यालय तसेच संबंधित बँकांकडून आवश्यक माहिती मागविण्यात आली असून पात्र शेतकऱ्यांची अंतिम यादी तयार केली जाणार आहे.

loan waiver : शेतकरी कर्जमाफीसाठी मोठी अट; राज्य सरकारचे निकष जाहीर !

राज्यात यापूर्वी महाविकास आघाडी आणि महायुती सरकारच्या काळात दोन मोठ्या कर्जमाफी योजना राबविण्यात आल्या होत्या. या योजनांमधून हजारो कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. मात्र विविध अटी व निकषांमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहिले होते. नव्या निर्णयामुळे अशा शेतकऱ्यांनाही कर्जमुक्तीची संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे.

error: Content is protected !!