व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Bacchu kadu : राजुरा प्रकरणावर बच्चू कडू आक्रमक; सीबीआय चौकशीसाठी आंदोलनाचा इशारा

Bacchu kadu : राजुरा प्रकरणावर बच्चू कडू आक्रमक; सीबीआय चौकशीसाठी आंदोलनाचा इशारा

Bacchu kadu warna of protest for inquiry of rajura murder case : निरपराधांना न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही’; बुलढाण्यात बच्चू कडूंचा एल्गार

Buldhana राजुरा शिवारातील शिरविरहित मृतदेह प्रकरणातील तपासावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी व्हावी, या मागणीसाठी लवकरच आंदोलन उभारणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या प्रकरणात पोलिसांच्या तपासामुळे अन्याय झाल्याचा आरोप करण्यात येत असून, मध्यप्रदेशातील खकनार येथील संबंधित कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची बाजू जाणून घेणार असल्याचेही बच्चू कडू यांनी सांगितले. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Neet paper leak case : ‘नीट’ प्रकरणातील आरोपी मोटेगावकर यांच्या कथित बेनामी संपत्तीची चौकशी करा

राजुरा प्रकरणात ज्या तरुणीचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता, ती जिवंत असल्याचे पुढे समोर आल्यानंतर संपूर्ण तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.

या प्रकरणातील मूळ मृतदेहाची ओळख आणि खरे आरोपी अद्याप समोर आले नसल्याचा मुद्दा उपस्थित करत बच्चू कडू यांनी तपास यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केले. संबंधित गुन्ह्याचा सखोल तपास करून वास्तविक आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच, चुकीच्या तपासासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई करावी, असेही ते म्हणाले. केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाई करून प्रकरण संपविण्याचा प्रयत्न होऊ नये, अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी सीबीआयकडे तपास सोपविण्याची मागणी करत बच्चू कडू यांनी व्यापक आंदोलनाचा इशारा दिला आहे. पीडितांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!