If Karad’s property is confiscated, his God Father will also be confiscated : कराडची प्रॉपर्टी जप्त केली तर त्याच्या आकाचीही जप्ती होईल
Nagpur : एसटीच्या दरवाढीवरून काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. एसटी ही महाराष्ट्रातील जनतेची जीवनवाहिनी आहे. गरीब, मजूर, महिला , कामगारांसाठी एसटी आहे. गरीब जनतेला त्यांना वेठीस धरणे योग्य नाही. ही एकाप्रकारे गरीब जनतेची लूट आहे. एसटी दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
नागपुरात आज (२५ जानेवारी० ते पत्रकारांशी बोलत होते. एसटीमध्ये भ्रष्टाचार होत आहे. बस खरेदीचे कंत्राट आता सरकारने रद्द केले. एसटी महामंडळात होणाऱ्या भ्रष्टाचाराला सरकार खतपाणी घालत आहे. ह्यात एसटीचा तोटा होत नाही का? याचा भार गोरगरीब , सामान्य जनतेवर सरकार का लादत आहे , असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
Local government body : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारांच्या अधिकारांचे हनन नाही का?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात लवकरच सुनावणी होणार आहे. यावेळी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण सुरक्षित ठेवले पाहिजे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० हजार जागा या ओबीसींच्या हक्काच्या आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नये, असे झाले तर ओबीसी समाज हे सहन करणार नाही, असा इशारा देखील वडेट्टीवार यांनी दिला.
बीडमधील संतोष देशमुख प्रकरणात वाल्मीक कराड याच्या एका मागून एक प्रॉपर्टी समोर येत आहेत. तरीही इडी, सीबीआय तपास का करत नाही. कराडची प्रॉपर्टी जप्त केली तर त्याचा आका जो मंत्री आहे, त्याची प्रॉपर्टी जप्त होईल , सरकारची अशी काय मर्जी कराडवर आहे, असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.