Breaking

Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचे प्रत्युत्तर, संजय राऊत डोक्यावर पडलेले व्हॅल्युअर

 

The trust lost due to internal struggles in Congress will not be regained : काँग्रेसमधील अंतर्गत लाथाळ्यांनी गमावलेला विश्नास परत मिळणार नाही

Nagpur : शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत हे डोक्यावर पडलेले व्हॅल्युअर आहेत. त्यांनी तथ्य तरी लक्षात घेऊन बोलावे, असे बावनकुळे म्हणाले. ते शनिवारी (25 जानेवारी) त्यांच्या कोराडी येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत डोक्यावर पडलेले व्हॅल्युअर आहेत. कोराडी जगदंबा मंदिराचे आम्ही नूतनीकरण केले. ते म्हणतात, की सहाशे कोटींची जमीन दिली. मी त्यांना मंदिरात बोलावून ६०० कोटींची जमीन दाखविण्यास सांगणार आहे. त्या जमिनीचा बाजार भाव चार कोटी तीस लाख रुपये आहे. आता ९० लाख रुपये संस्थेमार्फत भरण्यात आले आहेत, असेही चंद्रशेखर बाबनकुळे यांनी एक रुपयांत जमीन घेतल्याच्या आरोपवर स्पष्टीकरण दिले.

Nana Patole : विधानसभा निवडणुकीत केंद्र सरकारने बांग्लादेशातून मतदार आणले होते का?

 

यावेळी त्यांनी मविआच्या ईव्हीएम नॅरेटिव्हवरदेखील टीका केली. विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे आघाडीचे नेते आता ईव्हीएमवर खापर फोडत आहेत. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रचारासाठी त्यांच्याकडे काहीच मुद्दा नाही. त्यामुळे ईव्हीएम सेट केल्याचा नवा नॅरेटिव्ह काँग्रेसच्यावतीने सेट केला जात आहे. शनिवारी पुकारण्यात आलेले आंदोलन म्हणजे काँग्रेसचे फोटोसेशन असल्याचा चिमटा त्यांनी काढला.

लोकसभेच्या निवडणुकीत जेव्हा आम्हाला फटका बसला. तेव्हा आम्ही ईव्हीएमला दोष देत नाही बसलो. त्याऐवजी आत्मपरीक्षण केले. झालेल्या चुका टाळल्या. लोकांमध्ये गेलो. त्यांच्या मागण्या आणि गरजा जाणून घेतल्या. भाजप आणि महायुतीने विधानसभेच्या निवडणुकीची काय काय तयारी केली, याची माहिती आम्ही वारंवार दिली आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj : नागपुरकरांना छत्रपती शिवरायांची वाघनखे पाहण्याची संधी

 

सायंकाळी वाढलेल्या मतदानाची सविस्तर माहितीही खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात विरोधकांना दिली. सध्या इंडिया आघाडीतील नेत्यांमध्ये ईव्हीएमबाबत मतभेद आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हा विषय बंद करण्याचा सल्ला दिला आहे. असे असतानाही वारंवार तो मुद्दा काँग्रेसतर्फे मांडला जात आहे. मात्र, आता त्यांच्या आंदोलनाने फार काही फरक पडणार नाही. काँग्रेसमधील अंतर्गत लाथाळ्यांनी गमावलेला विश्नास परत मिळणार नाही, असा दावा त्यांनी केला.