व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Chikhli APMC : चिखली बाजार समितीच्या सभापतीपदी समाधान सुपेकर; पदभार स्वीकारताच बाजार...

Chikhli APMC : चिखली बाजार समितीच्या सभापतीपदी समाधान सुपेकर; पदभार स्वीकारताच बाजार बंदचे आव्हान

Samadhan Supekar elected Chairman of the Chikhli Market Committee; faces the challenge of a market shutdown : पक्षश्रेष्ठींची पसंती ठरली निर्णायक; व्यापारी आंदोलनामुळे पहिल्याच दिवशी कसोटी

Chikhli येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी पक्षश्रेष्ठींचे पाठबळ लाभलेले समाधान सुपेकर यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर कार्यकर्ते आणि समर्थकांनी जल्लोष साजरा करत त्यांचा सत्कार केला.

सभापतीपदाच्या निवड प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजेंद्र घोंगे यांनी कामकाज पाहिले. या वेळी दोन संचालकांचा अपवाद वगळता सर्व संचालक उपस्थित होते. पक्षश्रेष्ठींनी सभापतीपदासाठी समाधान सुपेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर त्यांच्या उमेदवारीचे तीन अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र, अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीनंतर अन्य कोणताही उमेदवार शिल्लक न राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र घोंगे यांनी सुपेकर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.

निवडीनंतर बाजार समिती परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शेतकरी, व्यापारी आणि बाजार समिती कार्यक्षेत्रातील विविध घटकांनी समाधान व्यक्त करत त्यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीच्या विकासाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Prakash Ambedkar : संकटाच्या काळात मोदी मौन बाळगतात, परदेश दौऱ्यांमध्ये व्यस्त असतात, प्रकाश आंबेडकरांची टीका

यावेळी श्रीकिसन धोंडगे, गणेश थुट्टे, परमेश्वर पवार, श्रीकृष्ण मिसाळ, पांडुरंग भुतेकर, संतोष वाकडे, कमल कुळसुंदर, मंदाबाई भुतेकर, रामेश्वर जाधव, संतोष वानखेडे, रामेश्वर खेडेकर, मनोज लाहूडकर, समाधान परिहार, संजय गवई, राजेश पवार आदी संचालक उपस्थित होते.

दरम्यान, नव्या सभापतींसमोर पदभार स्वीकारताच मोठे आव्हान उभे ठाकले आहे. व्यापारी संघटनेच्या विविध मागण्या अद्याप प्रलंबित असून, एमआयडीसी परिसरात बाजार समितीचा परवाना नसताना काही व्यापाऱ्यांकडून शेतमाल खरेदी-विक्री होत असल्याचा आरोप व्यापारी असोसिएशनने केला आहे. यासंदर्भात १५ मे २०२६ रोजी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.

तक्रारीनंतर संबंधित खासगी गोदामांची तपासणी करण्यात आली असून, त्या अहवालावर सोमवार, १५ जून रोजी बुलढाणा येथे सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी सर्व आडते खरेदीदारांना उपस्थित राहावे लागणार असल्याने व्यापाऱ्यांनी सोमवारी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Us Iran peace deal : अमेरिका-इराण शांतता कराराची मोठी घोषणा; कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण

सुनावणीनंतरही कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी कैलास शर्मा यांनी दिला आहे. त्यामुळे नव्याने निवडून आलेले सभापती समाधान सुपेकर यांच्यासमोर सुरुवातीलाच व्यापारी संघटनेच्या मागण्या, बाजार बंद आणि बाजार व्यवस्थापनाचा प्रश्न सोडविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

error: Content is protected !!