व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Prafulla gudadhe: जिथे खासदार, आमदार फुटतायत, तिथे नगरसेवकांकडून काय अपेक्षा करणार?; पराभवानंतर...

Prafulla gudadhe: जिथे खासदार, आमदार फुटतायत, तिथे नगरसेवकांकडून काय अपेक्षा करणार?; पराभवानंतर काँग्रेस शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधेंची उद्विग्न प्रतिक्रिया

Prafulla gudadhe attacks BJP after congress candidate atul londhe lost the legislative election : आमची १०० मते फुटलेली नाहीत, तर पक्षाच्या ३९ नगरसेवकांनी ‘क्रॉस व्होटिंग’ केले, गुडधे यांचा दावा

Nagpur नागपूर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल लोंढे यांच्या दारुण पराभवानंतर काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांनी अत्यंत उद्विग्न आणि तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीची तब्बल १०० मते फुटल्याचा दावा केला जात असताना, गुडधे यांनी हा दावा फेटाळून लावला. आमची १०० मते फुटलेली नाहीत, तर माझ्या माहितीनुसार पक्षाच्या ३९ नगरसेवकांनी ‘क्रॉस व्होटिंग’ केले आहे.

सत्ताधारी भाजपकडून देशभरात पैशांचा महापूर आणि दबावाचे राजकारण सुरू आहे. अशा परिस्थितीतही भाजपच्या या सत्तेला आणि पैशाला बळी न पडता महाविकास आघाडीचे १३० मतदार आमच्या पाठीशी ताकदीने उभे राहिले आणि त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी मतदान केले, हीच आमच्यासाठी सर्वात समाधानाची बाब आहे, असे गुडधे म्हणाले. सद्य राजकीय परिस्थितीवर प्रहार करताना त्यांनी थेट सवाल केला की, आज देशात जिथे मोठे खासदार आणि आमदार उघडपणे फुटत आहेत, तिथे छोट्या नगरसेवकांकडून आम्ही काय अपेक्षा करणार?

Atul londhe : माझ्यामुळेच भाजप नगरसेवकांना गोवा फिरण्याची संधी मिळाली; दारुण पराभवानंतर काँग्रेसचे अतुल लोंढे यांचा टोला

पुढे बोलताना प्रफुल्ल गुडधे यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. आज देशभरात फोडाफोडीचे गलिच्छ राजकारण सुरू आहे. या खेळात फुटणारा जेवढा दोषी आहे, तेवढाच फोडणाराही दोषी आहे. त्यामुळे मतदारांना पैसे देऊन खरेदी करणाऱ्यांनाही तितकेच दोषी ठरवले पाहिजे. आमचा पक्ष नेहमीच एकसंध ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे, मात्र ज्यांना पैशांच्या मोहापायी जायचे आहे त्यांनी खुशाल जावे, आम्ही कोणालाही थांबवणार नाही. आज जे पैशासाठी फुटले, ते उद्याही फुटतील आणि परवा तर नक्कीच फुटतील; अशा लोकांवर भविष्यात कसा भरवसा ठेवायचा? त्यामुळे पैशांचे हे राजकारण थांबवण्याची आता गरज उरलेली नाही.

Dr. Rajeev potdar: पोतदार जिंकले, केदार कोंडीत; आता आमदाराचा रोख जिल्हा बँक घोटाळ्याकडे

यापूर्वीही काँग्रेस सोडून अनेक मोठे नेते गेले आहेत, त्याने पक्षाला काहीही फरक पडत नाही. काँग्रेस हा सव्वाशे वर्षे जुना आणि जनतेच्या विचारांतून निर्माण झालेला पक्ष आहे. येथे लोक येत राहतील आणि जात राहतील, पण पक्षाचा लढा सुरूच राहील, असा ठाम विश्वास गुडधे यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!