Waghnakh of Chhatrapati Shivaji Maharaj will come to Nagpur : फेब्रुवारीत प्रदर्शन; माजी मंत्री मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे वाघनखं आली भारतात
Nagpur छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला होता, ती वाघनखं नागपुरात धडकणार आहेत. मध्यवर्ती पुरातत्व वस्तुसंग्रहालयात (अजब बंगला) फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयापासून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि शिवशस्त्रशौर्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
शनिवारी प्रदर्शनाच्या तयारीची पाहणी करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar यांच्याकडे सांस्कृतिक खातं असताना त्यांनी ही वाघनखं भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले होते. वाघनखांना भारतात आणण्याकरिता त्यांनी लंडन येथे जाऊन तेथील सरकारसोबत करार केला. त्यानंतरच वाघनखांचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला. आता विशिष्ट कालावधीसाठी भारतातील शिवप्रेमींसाठी ही वाघनखं भारतात राहणार आहेत.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी सांगितला वसुंधरेचं कर्ज फेडण्याचा उपाय !
संग्रहालयाच्या अस्थायी सभागृहामध्ये वाघनखे आणि शिवशस्त्रशौर्य प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या सभागृहात व परिसरातही शिल्प दालन व शिलालेखांच्या मांडणीबाबत सुरू असलेल्या तयारीची पाहणी यावेळी करण्यात आली. शिवशस्त्रशौर्य प्रदर्शनात विविध प्रकाराच्या तलवारी, ढाल, भाले, कटयारी आदी मांडण्यात येणार आहे. जवळपास ८ महिने हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील. नागपूर जिल्ह्यासह इतर ठिकाणाहून विविध शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमधून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी यावेत यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.
या वाघनखांनीच छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला होता. वाघनखे गेल्या अनेक दशकांपासून लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये ठेवण्यात आली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली ही ‘वाघनखे’ एक ऐतिहासिक अनमोल ठेवा मानला जातो. त्याच्याशी राज्यातील जनतेच्या भावना जुळलेल्या आहेत. वाघाच्या पंजाप्रमाणे हे शस्त्र आहे.
CDCC Bank Chandrapur : नोकर भरतीतील आरक्षणासाठी मुनगंटीवारांचा थेट मुख्यमंत्र्यांना कॉल !
असा आहे इतिहास
छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या ‘शिवाजी अँड हिज टाइम्स’ या पुस्तकानुसार ही घटना 1659 साली घडली. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी काम करावे, मांडलिकत्व पत्करावं म्हणून विजापूर संस्थानाचा राजा आदिल शाह याने अफझलखानाला शिवाजी महाराजांकडे पाठवले होते. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या दोन निष्ठावंत मावळ्यांना घेऊन भेटीला गेले होते. अफजलखान पाच जणांसह तेथे आला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांना अफझलखानाच्या हेतूबद्दल आधीच संशय आला होता आणि त्यामुळेच ते पू्र्ण तयारीनिशी आले होते. अफझलखानाने छत्रपती शिवाजी महाराजांना मिठी मारण्याच्या बहाण्याने हल्ल्याचा प्रयत्न केला. असा काही हल्ला होऊ शकतो, याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांना आधीच कल्पना होती. अफझल खानाने मिठी मारण्याच्या बहाण्याने हल्ला करताच शिवाजी महाराजांनी वाघनखे काढून अफझलखानाला ठार केले.