Maharashtra government to announce draught package on Tuesday : मंत्रिमंडळ बैठकीत मोठ्या घोषणेचे संकेत, हालचाली वाढल्या
Nagpur राज्यात निर्माण झालेली गंभीर दुष्काळी परिस्थिती आणि संकटात सापडलेला शेतकरी या पार्श्वभूमीवर उद्या मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महायुती सरकार दुष्काळ निवारणासाठी मोठे विशेष पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे. विरोधकांचा वाढता दबाव, राष्ट्रवादी काँग्रेस (स.प.) प्रमुख शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांचे दुष्काळग्रस्त दौरे, तसेच शेतकऱ्यांचा रोष लक्षात घेता महायुती सरकारने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत.
दुष्काळाच्या मुद्द्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. एनडीआरएफ अंतर्गत केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी ठराविक नियमांनुसार सर्वेक्षण करणे बंधनकारक असते. हे नियम आधीपासूनच लागू असून विरोधकांनाही याची पूर्ण कल्पना आहे. तरीही प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची वाईट सवय विरोधकांना जडली आहे, अशी कडक टीका मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच, हवामान खात्याच्या अंदाजानुसार सरकारने आधीपासूनच चाऱ्यासाठी वैरण विकास कार्यक्रमासह अनेक आपत्कालीन उपाययोजना सुरू केल्या असून येत्या आठवड्यात सरकार आपली थेट मदत जाहीर करेल, असे संकेतही त्यांनी दिले.
Parinay fuke : राहुल गांधींना आता जोकर म्हणण्याची वेळ आली आहे, भाजप आमदाराचा टोला
दुसरीकडे, दुष्काळी परिस्थितीवरून विरोधक अत्यंत आक्रमक झाले आहेत. शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार असून, रोहित पवार यांनी विदर्भापाठोपाठ मराठवाड्यात दौरा सुरू केला आहे. कर्नाटकाप्रमाणे महाराष्ट्रातही दुष्काळावर चर्चा करण्यासाठी तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावावे, अशी मागणी रोहित पवार यांनी लावून धरली आहे. सरकार शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आणखी किती वाट बघणार असा सवाल करत विरोधकांनी सरकारवर चौफेर कोंडी केली आहे. या राजकीय रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकार कोणती मोठी दिलासादायक घोषणा करते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.








