व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sunetra Pawar : ‘तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद होता…’आठवणींनी डोळे पाणावले”

Sunetra Pawar : ‘तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद होता…’आठवणींनी डोळे पाणावले”

sunetra-pawar-emotional-post-on-ajit-pawar-birth-anniversary : अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट

Mumbai: राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पत्नी तसेच राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर अत्यंत भावनिक पोस्ट शेअर केली आहे. अजित पवार यांच्यासोबतच्या काही आठवणींना उजाळा देत त्यांनी त्यांच्या सहवासातील क्षण, मिळालेला आधार आणि आयुष्यातील पोकळी शब्दबद्ध केली आहे. त्यांच्या या पोस्टने अनेक कार्यकर्ते आणि समर्थक भावूक झाले आहेत.

बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात त्यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. त्यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांनी शेअर केलेल्या पत्रात आपल्या भावना व्यक्त करत, हा दिवस आता आनंदाऐवजी वेदना देणारा ठरल्याचे म्हटले आहे.

Neet Paper leak : नीट पेपरफुटी प्रकरण तापलं; उद्धव ठाकरे जंतरमंतरवर

पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “दादा… इतकी वर्षे तुमचा वाढदिवस आनंद, उत्साह आणि अभिमानाने साजरा केला. घरात आनंदाचे वातावरण असायचे, शुभेच्छांचा वर्षाव व्हायचा. पण आज तोच दिवस ‘जयंती’ म्हणून साजरा करताना मन आतून तुटून जात आहे. हे कटू वास्तव स्वीकारण्याची ताकद आजही माझ्यात आलेली नाही.”

सुनेत्रा पवार यांनी पुढे अजित पवारांच्या सहवासाची आठवण सांगताना, “आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद बनून माझ्या पाठीशी उभे राहिलात. कठीण प्रसंगी तुमचा भक्कम आधार, विश्वास देणारी थाप आणि कायमची साथ मला बळ देत होती. आज हे सर्व अचानक हरपल्याची जाणीव मनाला सतत अस्वस्थ करते,” असे भावनिक शब्दांत नमूद केले.

त्यांनी पुढे लिहिले की, अजित पवार शारीरिकदृष्ट्या आज सोबत नसले तरी त्यांचे विचार, लोकांप्रती असलेला सेवाभाव, शिस्त, प्रेम आणि समाजासाठीचे कार्य कायम प्रेरणा देत राहील. त्यांच्या आठवणी प्रत्येक श्वासात जिवंत राहतील, असे सांगत त्यांनी आपल्या दिवंगत जीवनसाथीला भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

Rahul Gandhi : विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठीच मोदी निवासाबाहेर ठिय्या आंदोलन

सुनेत्रा पवार यांच्या या भावनिक पोस्टवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह विविध राजकीय नेते, समर्थक आणि नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी अजित पवार यांच्या कार्याची आठवण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली असून सुनेत्रा पवार यांना धीर देणारे संदेशही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.

error: Content is protected !!