व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण contaminated water supply : दूषित पाणीपुरवठ्याविरोधात युवासेना रस्त्यावर; पाण्याच्या टाकीवर पाच तास...

contaminated water supply : दूषित पाणीपुरवठ्याविरोधात युवासेना रस्त्यावर; पाण्याच्या टाकीवर पाच तास ठिय्या आंदोलन

Yuvasena takes to the streets against contaminated water supply; stages a five-hour sit-in atop a water tank : दुधलगाव-मोरखेडसह दहा गावांना शुद्ध पाणी द्या; लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

Malkapur मोरखेड दहा गाव पाणीपुरवठा योजनेतून नागरिकांना होत असलेला दूषित पाणीपुरवठा तातडीने बंद करून शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, या प्रमुख मागणीसाठी युवासेना उपजिल्हाप्रमुख शुभम घोंगटे व माजी युवासेना तालुकाप्रमुख गणेश सुशिर यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात पाण्याच्या टाकीवर चढून तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

मोरखेड दहा गाव पाणीपुरवठा योजनेंतर्गत मलकापूर तालुक्यातील मोरखेड, दुधलगाव, लोणवडी, खामखेड, गौलखेड, आळंद, हरणखेड तसेच मोताळा तालुक्यातील न्हावी, दाभाळी आणि माकोडी या दहा गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून या गावांमध्ये दूषित व अस्वच्छ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Amravati municipal corporation : महापालिकेतील महायुतीत फूट? ६१ कोटींच्या ‘नॅकॉफ’ कंत्राटावरून युवा स्वाभिमानचा विरोध; भाजप-राष्ट्रवादीने बहुमताने दिली मंजुरी

वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने संतप्त झालेल्या युवासेनेने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. शुभम घोंगटे व गणेश सुशिर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी भर पावसात पाण्याच्या टाकीवर चढून ठिय्या आंदोलन सुरू केले. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी माने यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. पाणीपुरवठ्याची गुणवत्ता तपासून तातडीने शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Pravin pote: उड्डाणपुलावरील भीषण अपघातानंतर प्रवीण पोटे पाटील संतप्त; अधिकाऱ्यांसह करणार प्रत्यक्ष पाहणी

दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर आणि अजय सावळे यांनी मध्यस्थी करत प्रशासनाशी समन्वय साधला. त्यांच्या प्रयत्नांमुळे प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाची सकारात्मक सांगता झाली.

error: Content is protected !!