While the convoy was approaching Mumbai after flag-waving, they stopped and helped an injured biker : ध्वजवंदन करून मुंबईकडे येत असताना ताफा थांबवून जखमी बाईकस्वराला केली मदत
मुंबई :- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ‘सीएम’ चे ‘डिसीएम’ झाले पण त्यांचा स्वभाव मात्र काही बदलायचे नाव घेत नाही. गरजूच्या मदतीला धावून जाणे, या त्यांचा संवेदनशीलपणाचा प्रत्यय ते मुख्यमंत्री असताना अनेकदा पहायला मिळायचा. मात्र आज प्रजासत्ताक दिनी त्यांचा डिसीएम म्हणजेच ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ वाला बाणा पुन्हा एकदा मुंबईकरांना पहायला मिळाला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे येथील साकेत मैदानात आयोजित केलेल्या ध्वजवंदन आणि संचलन सोहळा पार पडल्यानंतर मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या दुसऱ्या मार्गिकेच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री शिंदे हे ठाण्याकडून मुंबईला जायला निघाले.
Sudhir Mungantiwar : नाना-नानी पार्क कुटुंबांसाठी आनंद केंद्र बनेल !
उपमुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा पूर्व द्रुतगती महामार्गावरून घाटकोपर जवळ आला असता अचानक रस्त्यावर त्यांना एका दुचाकीचा अपघात होऊन तरुण जखमी झाल्याचे दिसले. तत्काळ त्यांनी आपला ताफा रस्त्याच्या बाजूला घेत गाडीतून उतरून या तरुणाची विचारपूस केली. दुचाकीवरून पडल्याने या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ इतर तरुणांच्या साथीने त्याला उचलून रुग्णालयात न्यायला सांगितले. एवढेच नव्हे तर आपल्या ताफ्यातील गाडी आणि पोलिस सोबत देऊन या तरुणाला राजावाडी रुग्णालयात दाखल करायला सांगितले. तसेच गाडीत बसलेल्या तरुणाला ‘तू सुखरूप आहेस काळजी करू नकोस, आपण तुला पूर्ण बरे करू’ असे सांगून आधार दिला.
MVA facing internal politics : राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश
शिंदे हे आपल्या भाषणात कायमच मी ‘सीएम’ म्हणजे ‘चीफ मिनीस्टर’ नसून मी ‘सीएम’ म्हणजेच ‘कॉमन मॅन’ आहे असे सांगायचे. मात्र आता उपमुख्यमंत्री म्हणजे ‘डिसीएम’ झाल्यावर त्यांनी आता आपण ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ असल्याचे ते सांगू लागले. मात्र हे फक्त बोलण्यापुरेत नसून हा ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ असलेला डीसीएम, कॉमन मॅन साठी कसा तत्परतेने धावून जातो तेच या प्रसंगाने पुन्हा एकदा सर्वांना दाखवून दिले.