व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Vijay Wadettiwar : वैधता नसलेली ओबीसी आणि कुणबी प्रमाणपत्रे दिलीच कशासाठी?

Vijay Wadettiwar : वैधता नसलेली ओबीसी आणि कुणबी प्रमाणपत्रे दिलीच कशासाठी?

vijay-wadettiwar-slams-mahayuti-government-over-obc-and-kunbi-caste-certificates-row : विजय वडेट्टीवारांचा महायुती सरकारला संतप्त सवाल

Nagpur : मराठवाड्यात काही नगरसेवकांसह मराठा समाजाच्या उमेदवारांना देण्यात आलेली ओबीसी आणि कुणबी जात प्रमाणपत्रे जात वैधता पडताळणी समितीने रद्द केल्याने राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणावर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली असतानाच, आता काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही महायुती सरकारला थेट सवाल केला आहे. जर ही प्रमाणपत्रे कायदेशीर निकषांमध्ये बसत नव्हती, तर सरकारने त्यांचे वाटपच का केले, असा संतप्त प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
मराठवाड्यातील तीन जिल्हा परिषद सदस्य आणि एका नगरसेवकाचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. शासनाने दिलेल्या प्रमाणपत्रांच्या आधारे अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते आणि विजयीही झाले होते. मात्र, आता ही प्रमाणपत्रे रद्द झाल्याने संबंधित रिक्त जागांवर पुन्हा निवडणुका घेण्याची वेळ आली आहे.
या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, ओबीसी आरक्षण हा संविधानाने दिलेला अधिकार असून, त्याला कोणत्याही प्रकारचा धक्का लागता कामा नये. कायद्याच्या चौकटीत घेतलेले निर्णयच न्यायालयात टिकतात. केवळ राजकीय फायद्यासाठी जात प्रमाणपत्रांचे वाटप करून चालत नाही, तर त्यांची वैधता कायदेशीर पुरावे आणि निर्धारित निकषांवर आधारित असणे आवश्यक आहे.

Manoj Jarange : बावनकुळेंच्या सांगण्यावरून मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्रे रद्द?

नियमबाह्य पद्धतीने दिलेली प्रमाणपत्रे अखेर रद्द होतात आणि त्याचा फटका लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्य नागरिकांनाही सहन करावा लागतो, असे सांगत वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले. “जर ही प्रमाणपत्रे नियमांमध्ये बसत नव्हती, तर सरकारने अशी नियमबाह्य कामे केलीच कशासाठी? नेमके कोणाच्या दबावाखाली हे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले?” असा सवाल करत त्यांनी महायुती सरकारच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

दरम्यान, या घडामोडींमुळे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी महायुतीच्या नेत्यांचा पराभव करण्याचे आवाहन करत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी केला.

Sunetra Pawar : प्रशांत किशोर यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी अचानक भेट

या संपूर्ण वादामुळे राज्यात पुन्हा मराठा आणि कुणबी आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून, आगामी काळात हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!