व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Akola Municipal corporation : आमदारांच्या विकासकामांच्या एनओसीवरून विरोधी पक्षनेता-सभागृह नेत्यात खडाजंगी

Akola Municipal corporation : आमदारांच्या विकासकामांच्या एनओसीवरून विरोधी पक्षनेता-सभागृह नेत्यात खडाजंगी

Heated clash between the Leader of the Opposition and the Leader of the House over NOCs for MLAs’ development works : सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप; अखेर मतदानाची मागणी मागे, एनओसीला सभागृहाची मंजुरी

Akola महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आमदार साजिद खान पठाण यांच्या विकासकामांसाठी आवश्यक असलेल्या ना-हरकत प्रमाणपत्राच्या (एनओसी) मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. विरोधी पक्षनेते डॉ. जिशान हुसेन आणि सभागृहनेते पवन महल्ले यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. त्यामुळे काही काळ सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते.

विरोधी पक्षनेते डॉ. हुसेन यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खासदारांच्या विकासकामांसाठी विषयसूचीत त्यांच्या नावाचा उल्लेख करून एनओसी दिली जाते, त्याच निकषावर आमदार साजिद खान पठाण यांच्या नावाचाही स्पष्ट उल्लेख करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. लोकप्रतिनिधींमध्ये असा दुजाभाव का केला जात आहे, असा सवाल त्यांनी प्रशासनाला केला.

काँग्रेसच्या नगरसेविका निलोफर खान यांनीही हा मुद्दा लावून धरत सर्व लोकप्रतिनिधींना समान निकष लागू करण्याची मागणी केली. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली.

Akola Municipal Corporation : ‘निधी बिल्डरांच्या घशात घातला’, मनपा सभेत आरोप-प्रत्यारोपांनी गदारोळ

सलाम यांचे समन्वयाचे आवाहन

या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नगरसेवक सलाम यांनी समन्वयाची भूमिका घेत दोन्ही बाजूंना संयम बाळगण्याचे आवाहन केले. प्रभाग क्रमांक १ मध्ये आधीच विकासकामांचा वेग कमी आहे. एनओसीच्या वादामुळे विकासकामे रखडली, तर त्याचा थेट फटका नागरिकांना बसेल. त्यामुळे शहरहिताचा विचार करून हा विषय मार्गी लावावा, अशी विनंती त्यांनी केली.

‘विकासकामांत राजकारण करणार नाही’

स्थायी समितीचे सभापती विजय अग्रवाल यांनी हस्तक्षेप करत विकासकामांबाबत सकारात्मक भूमिका मांडली. शहराच्या विकासासाठी कोणताही लोकप्रतिनिधी निधी आणत असेल, तर त्याचे स्वागतच केले जाईल. प्रसंगी संबंधित लोकप्रतिनिधींच्या घरी जाऊनही स्वागत करू, असे अग्रवाल यांनी सांगितले. अकोला शहरात जास्तीत जास्त विकासकामे व्हावीत, हीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, एनओसीच्या मुद्द्यावर चर्चा करायची असल्यास ती पूर्णपणे करावी आणि आवश्यक असल्यास मतदान घ्यावे, अशी ठाम भूमिका त्यांनी सुरुवातीला मांडली. त्यामुळे सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

Rakesh Tikait : ‘मी दिल्लीत आंदोलन उभारतो, तुम्ही अकोल्यातून साथ द्या’; राकेश टिकैत यांची शेतकऱ्यांना हाक

दरम्यान, नगरसेवक सलाम यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत स्थायी समितीचे सभापती विजय अग्रवाल यांनी मतदानाची मागणी मागे घेतली. त्यानंतर आमदार साजिद खान पठाण यांच्या विकासकामांसाठी आवश्यक असलेल्या एनओसीच्या प्रस्तावाला सभागृहाने मंजुरी दिली.

error: Content is protected !!