व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Akola Municipal Corporation : ‘निधी बिल्डरांच्या घशात घातला’, मनपा सभेत आरोप-प्रत्यारोपांनी गदारोळ

Akola Municipal Corporation : ‘निधी बिल्डरांच्या घशात घातला’, मनपा सभेत आरोप-प्रत्यारोपांनी गदारोळ

“Is the MLA fund meant for the people or for builders?” Mayor Sharda Khedkar raises a direct question in the House : आमदारांचा निधी जनतेसाठी की बिल्डरांसाठी?; महापौर शारदा खेडकरांचा सभागृहात थेट सवाल

Akola महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून होणाऱ्या कामांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. महापौर शारदा खेडकर यांनी आमदारांच्या निधीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित करत, हा निधी सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी आहे की बिल्डरांच्या फायद्यासाठी, असा थेट सवाल सभागृहात केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहात काही काळ वातावरण चांगलेच तापले.

महापौर शारदा खेडकर यांनी सांगितले की, त्यांच्या प्रभागासाठी ३० लाख नव्हे, तर तब्बल ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, या निधीचा अपेक्षित लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. विकासकामांच्या नावाखाली निधी खर्च केला जात असला, तरी नागरिकांच्या मूलभूत समस्या कायम असल्याचे त्यांनी नमूद केले.

१५ लाखांच्या रस्त्याच्या कामावरही प्रश्नचिन्ह

महापौरांनी खदान परिसरातील १५ लाख रुपयांच्या रस्त्याच्या कामाचाही सभागृहात उल्लेख केला. संबंधित रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे पावसाळ्यात पाणी नागरिकांच्या घरात शिरत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्याचा दावा त्यांनी केला. विकासकामांमुळे नागरिकांच्या अडचणी दूर होण्याऐवजी त्या वाढत असतील, तर संबंधित कामांच्या गुणवत्तेची चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

Rakesh Tikait : ‘मी दिल्लीत आंदोलन उभारतो, तुम्ही अकोल्यातून साथ द्या’; राकेश टिकैत यांची शेतकऱ्यांना हाक

भाजपच्या प्रभाग क्रमांक १३ च्या नगरसेविका सुनीता अग्रवाल यांनीही आमदारांच्या निधीच्या वापराबाबत गंभीर आरोप केले. आमदारांनी दिलेला निधी जनतेच्या विकासासाठी न वापरता बिल्डरांच्या फायद्यासाठी वापरण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या निधीतून करण्यात आलेल्या कामांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.

Uddhav Thackeray Shivsena: नागपूर उद्धव सेनेत अंतर्गत कलह शिगेला; संपर्कप्रमुखांच्या विरोधात पदाधिकारी एकवटले, लवकरच मुंबईत धडकणार!

निलोफर खान यांच्याशी शाब्दिक चकमक

निधीच्या मुद्द्यावरून महापौर शारदा खेडकर आणि नगरसेविका निलोफर खान यांच्यातही जोरदार शाब्दिक चकमक झाली. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याने सभागृहात काही काळ गदारोळ निर्माण झाला. सदस्य आक्रमक झाल्याने सभेचे कामकाजही काही काळ विस्कळीत झाले. आमदारांच्या विकास निधीतून झालेल्या कामांची गुणवत्ता, निधीचा प्रत्यक्ष वापर आणि त्याचा नागरिकांना मिळणारा लाभ यावरून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा झाली.

error: Content is protected !!