व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र NCP Ajit Pawar: सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीने राष्ट्रवादीत खळबळ,...

NCP Ajit Pawar: सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीने राष्ट्रवादीत खळबळ, प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू

Sunetra Pawar’s meeting with Prashant Kishor triggers a buzz within the NCP : मुंबईत झाली बैठक, जय पवारांची ऑनलाईन हजेरी

Mumbai राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रसिद्ध रणनीतिकार, नुकतेच बिहारमधील पोटनिवडणुकीत विजय मिळवून आमदार झालेले प्रशांत किशोर यांच्या भेटीतील तपशील उघड झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या बैठकीत प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिला असल्याची जोरदार चर्चा आहे.

प्रशांत किशोर यांनी अलीकडेच बिहारच्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव केला असून, विशेष म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या नेत्याच्याच क्षेत्रातील या अभेद्य बालेकिल्ल्याला त्यांनी सुरुंग लावला. या विजयानंतर किशोर यांनी मुंबईत येऊन सुनेत्रा पवार यांची भेट घेतली, तर या बैठकीत जय पवार हेसुद्धा ऑनलाईन उपस्थित होते.

Vijay wadettiwar : गोसेखुर्द उजव्या कालव्याचा बोजवारा: वर्षभरातच २३५ कोटींच्या कामाला भेगा; वडेट्टीवारांचा कंत्राटदारांवर संताप

रणनीतिकार म्हणून यापूर्वी भाजप, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांना सेवा दिलेल्या प्रशांत किशोर यांनी या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी रणनीतीसाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना बदलण्याची मागणी किंवा सल्ला दिल्याचे सांगितले जात आहे. प्रशांत किशोर यांचा हा सल्ला मानल्यास राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर तटकरे यांना पक्षातून आधीपासूनच विरोध होत असून, दुसरीकडे सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पत्रात त्यांनी सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या पदाचा उल्लेख टाळल्यापासूनच या नेत्यांना बाजूला सारण्याच्या चर्चा राष्ट्रवादीच्या वर्तुळात सुरू आहेत, त्यातच या नवीन भेटीमुळे महायुती आणि राष्ट्रवादीच्या अंतर्गत वर्तुळात मोठी चलबिचल निर्माण झाली आहे.

error: Content is protected !!