व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sudhir Mungantiwar चंद्रपूर-मुल महामार्गावरील खड्ड्यांच्या प्रश्नावर मुनगंटीवारांचा धडक पाठपुरावा ठरला निर्णायक; गडकरींकडून...

Sudhir Mungantiwar चंद्रपूर-मुल महामार्गावरील खड्ड्यांच्या प्रश्नावर मुनगंटीवारांचा धडक पाठपुरावा ठरला निर्णायक; गडकरींकडून दुरुस्तीला तात्काळ मंजुरी

Sudhir Mungantiwar’s persistent follow-up with Nitin Gadkari over potholes on the Chandrapur–Mul Highway proves decisive : वाढते अपघात आणि नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन केली होती मागणी

Chandrapur मुल–चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना होत असलेला प्रचंड त्रास, वाढत्या अपघातांची मालिका आणि नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न लक्षात घेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या विषयावर धडक पाठपुरावा केला. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधत तसेच सविस्तर पत्राद्वारे परिस्थितीची गंभीरता त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मुल–चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गाच्या तातडीच्या दुरुस्तीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच महामार्गावरील खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत करण्याच्या कामाला गती मिळणार आहे.

चंद्रपूर–मुल राष्ट्रीय महामार्ग (एनएच-९३०) हा जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भासाठी महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे. या मार्गावरून दररोज हजारो मालवाहू ट्रक, बस, चारचाकी, दुचाकी तसेच शेतकरी, विद्यार्थी, कर्मचारी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक प्रवास करतात. कृषी उत्पादनांची वाहतूक, औद्योगिक मालाची ने-आण आणि पर्यटनाच्या दृष्टीनेही या महामार्गाचे मोठे महत्त्व आहे. मात्र, पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. अनेक ठिकाणी अपघात घडले असून निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. रुग्णवाहिकांनाही वेळेत मार्गक्रमण करता येत नसल्याने आपत्कालीन आरोग्य सेवेलाही फटका बसत होता.

NCP Ajit Pawar: सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीने राष्ट्रवादीत खळबळ, प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू

या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सविस्तर पत्र पाठवून महामार्गाची तातडीने उच्च दर्जाची दुरुस्ती करण्याची मागणी केली. यासोबतच वारंवार होणारी रस्त्याची हानी कायमची थांबविण्यासाठी टप्प्याटप्प्याने संपूर्ण महामार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी देण्याचीही विनंती त्यांनी केली.

यावरच न थांबता आमदार मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृहात नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन महामार्गाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. बैठकीनंतर त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी दूरध्वनीवर थेट संवाद साधत महामार्गावरील खड्ड्यांमुळे निर्माण झालेली धोकादायक परिस्थिती, वाढते अपघात आणि तातडीने दुरुस्तीची आवश्यकता त्यांच्या निदर्शनास आणून दिली.

Vijay wadettiwar : गोसेखुर्द उजव्या कालव्याचा बोजवारा: वर्षभरातच २३५ कोटींच्या कामाला भेगा; वडेट्टीवारांचा कंत्राटदारांवर संताप

आमदार मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण आणि धडक पाठपुराव्याची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुल–चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गाच्या तातडीच्या दुरुस्तीला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे लवकरच दुरुस्तीची कामे सुरू होणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच भविष्यात हा मार्ग कायमस्वरूपी मजबूत व्हावा यासाठी सिमेंट काँक्रीटीकरणाच्या प्रस्तावाबाबतही सकारात्मक कार्यवाही व्हावी, यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

error: Content is protected !!