व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Gadchiroli ashram school snake bite incident : गडचिरोलीत घटनेनंतर मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर विरोधकांचा...

Gadchiroli ashram school snake bite incident : गडचिरोलीत घटनेनंतर मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर विरोधकांचा हल्लाबोल, सरकार बॅकफूटवर

Opposition attacks the Chief Minister’s governance following the incident in Gadchiroli; government on the back foot : पालकमंत्री फडणविसांनी घटनेची जबाबदारी घेण्याची आक्रमक मागणी

Nagpur गडचिरोली जिल्ह्यात सर्पदंशाने पाच विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आल्यानंतर राज्याचे राजकारण तापले आहे. आश्रम शाळेत बेड नसल्याने जमिनीवर झोपलेल्या आदिवासी मुलींना विषारी सापाने दंश केल्याची ही घटना असून, यात तीन विद्यार्थिनींचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोघींची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने त्यांना एअरलिफ्ट करून नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. या विदारक घटनेमुळे गडचिरोलीचे पालकमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारविरोधात विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे, अशी मागणी करत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हा कसला विकास? असा परखड सवाल केला आहे. आश्रम शाळांसाठी मिळणारा कोटींचा निधी जातो कुठे? आणि रुग्णालयात पोहोचण्यासाठी साधा रस्ता नसल्याने २५ किलोमीटरचा फेर मारावा लागतो, याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. तसेच, उद्धव सेनेचे नेते संजय राऊत यांनीही आदिवासी शाळांच्या नावाखाली दिल्या जाणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या वापराबाबत गंभीर शंका उपस्थित करत सरकारला धारेवर धरले आहे.

Navneet Rana : इन्होंने अभी तूफानों के झटके नहीं देखे… नवनीत राणांची पोस्ट व्हायरल!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारले असून या जिल्ह्याला ‘स्टील सिटी’ बनवण्याचा आणि कोट्यवधींची गुंतवणूक आणण्याचा विडा उचलला आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या व्यस्ततेमुळे अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची सहपालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, दोन-दोन पालकमंत्री असतानाही एका आश्रम शाळेतील मुलांना झोपण्यासाठी साधा बेडही उपलब्ध नाही, हे वास्तव या निमित्ताने पुन्हा एकदा उजेडात आले आहे.

AMIM : एमआयएम नगरसेवकाच्या ‘डीएनए टेस्ट’ची मागणी

विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे आणि वाढत्या दबावामुळे अखेर सरकार बॅकफूटवर आले असून, सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी तातडीने या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली आहे. या दुर्घटनेने प्रशासकीय यंत्रणेचा गलथान कारभार चव्हाट्यावर आणला असून यावर नेमकी काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!