व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Bjp Ncp dispute : भाजप-राष्ट्रवादीतील संघर्ष चिघळला, नगरसेवकांचा विकासनिधी शून्यावर

Bjp Ncp dispute : भाजप-राष्ट्रवादीतील संघर्ष चिघळला, नगरसेवकांचा विकासनिधी शून्यावर

bjp-ncp-dispute-chandrakant-patil-work-audit-suhas-tingre-amol-balwadkar-development-fund : मंत्री चंद्रकांत पाटलांच्या कामाच्या ऑडिटची मागणी

Pune : पुणे महापालिकेतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्यानंतर आता सुहास टिंगरे यांचाही विकासनिधी शून्य करण्यात आल्याने पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विशेष म्हणजे भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कामाचे ऑडिट करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या प्रस्तावाशी संबंधित दोन्ही नगरसेवकांची नावे चर्चेत आल्याने या निर्णयामागील राजकीय कारणांवरूनही चर्चा सुरू झाली आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी मांडला होता. या प्रस्तावाला सुहास टिंगरे यांनी अनुमोदन दिले होते. त्यानंतर अमोल बालवडकर यांचा विकासनिधी शून्य करण्यात आला आणि आता सुहास टिंगरे यांनाही विकासनिधीच्या बाबतीत मोठा धक्का बसला आहे.

या पार्श्वभूमीवर सुहास टिंगरे यांना त्यांच्या विकासनिधीला कात्री लावण्यामागे चंद्रकांत पाटील यांच्या कामाच्या ऑडिटच्या प्रस्तावावर केलेली सही कारणीभूत आहे का, असा सवाल करण्यात आला. यावर उत्तर देताना सुहास टिंगरे यांनी, ‘मला तशीच शक्यता वाटते,’ असे स्पष्ट विधान केले आहे. त्यामुळे पुणे महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Abhijeet Dipke : अभिजीत दिपकेंचा आता दादा भुसेंवर थेट हल्लाबोल !

सुहास टिंगरे यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या कार्यपद्धतीचाही दाखला दिला. अजित पवार यांनी राज्याचे अर्थमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री म्हणून अनेक वर्षे काम केले. त्यांच्या कारकिर्दीतही विविध आरोप करण्यात आले होते; मात्र आरोप झाले म्हणून त्यांनी कोणत्याही आमदाराचा किंवा खासदाराचा निधी रोखला नाही, असा दावा टिंगरे यांनी केला.

‘माझ्याबद्दल वैयक्तिक आकस असेल तर तो वेगळा विषय आहे; मात्र या निधीतून माझ्या प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांची कामे करायची होती,’ असे सुहास टिंगरे यांनी सांगितले. त्यांच्या प्रभागातील अनेक विकासकामे अद्याप प्रलंबित असून विकासनिधी शून्य झाल्यामुळे या कामांवर परिणाम होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज्यात आणि केंद्रात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची युती असली, तरी पुणे महापालिकेत परिस्थिती वेगळी असल्याचे सुहास टिंगरे यांनी स्पष्ट केले. पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे नागरिकांच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना जाब विचारणे आणि विकासकामांबाबत प्रश्न उपस्थित करणे ही विरोधी पक्ष म्हणून आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले.

Kishor jorgewar: चंद्रपुरात भाजपच्या आमदाराची दुहेरी फजिती: एका बाजूला अतिक्रमणावर बुलडोझर, तर दुसऱ्या बाजूला विरोधकांवरील डाव उच्च न्यायालयात उघडा

अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे या दोन्ही नगरसेवकांच्या विकासनिधीबाबत झालेल्या निर्णयामुळे पुण्यातील भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकीय समीकरणे पुन्हा चर्चेत आली आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या कामाच्या ऑडिटच्या मागणीवरून सुरू झालेला हा वाद आता विकासनिधीच्या मुद्द्यावर पोहोचल्याने आगामी काळात पुण्याच्या राजकारणात या संघर्षाचे पडसाद आणखी उमटण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!