Mallikarjun Kharge’s stupid, but equally infuriating question : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला जाहीर निषेध
Nagpur काँग्रेसने कायमच हिंदू धर्मियांच्या अस्मिता, श्रद्धा व भावनेचा अनादर केला. परंतु यावेळी, महाकुंभ मेळासारख्या पवित्र उत्सवाची, त्यात आस्थेने, श्रद्धेने सहभागी होणाऱ्या कोट्यवधी हिंदूंची, गंगेच्या पवित्रतेची अक्षरशः खिल्ली उडवली आहे. सगळ्यावर कळस काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी चढवला आहे, असल्याचे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
गंगेत स्नान केल्याने या देशातील गरिबी दूर होईल का, असा निर्बुद्ध पण तेवढाच संतापजनक प्रश्न काँग्रेसच्या या अध्यक्षाने उपस्थित केला आहे. खरगे यांच्या या विधानाने देशभरात संतापाची लाट उसळली आहे, असल्याचे मंत्री बावनकुळे यांनी X वर म्हटले आहे. एका विशिष्ट समुदायाचे काँग्रेसने कायमच लांगुलचालन केले. या देशात बहुसंख्य व सहिष्णू असलेल्या हिंदू समाजाने हे शांतपणे सहन केले व स्वीकारले. परंतु, हे करीत असताना हिंदूंच्या आस्थांची खिल्ली उडवण्याचा अधिकार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना कोणी दिला, असा सवाल मंत्री बावनकुळे यांनी केला.
Migrants of Madhya Pradesh : परप्रांतीयांकडून सरकारी जमीन का केली मुक्त?
काँग्रेसला हिंदूंची मते हवी असतात. पण मग हिंदूंचा तुम्हाला इतका तिरस्कार का आहे? नेमकी हिंदूंची चूक तरी काय आहे? स्वतंत्र भारताच्या इतिहासात सहा दशकाहून अधिक काळ तुम्हाला सत्तेत बसवलं. ही या देशातील हिंदूंची चूक आहे का? लोकसभेत ९९ का होईना पण खासदार निवडून आणू शकलात, त्या हिंदूंच्या भावनांचा आपण सन्मान करू शकत नसू तर किमान खिल्ली उडवून अपमान तरी करू नये, इतकेही भान तुम्हाला का असू नये, हे या हिंदूस्थानातील जनतेला प्रश्न पडले असल्याचेही ते म्हणाले.
PM Housing Scheme : महागाई आभाळात, घरकुलासाठी मात्र फक्त सव्वालाख!
या देशातील जनतेने सलग तीन वेळा स्पष्टपणे नाकारूनदेखील काँग्रेस पक्षाला शहाणपण येत नसेल तर या पक्षाला जनतेने नेमकी शिक्षा तरी काय द्यावी ? अर्थात या देशातील सुज्ञ जनता याचा निश्चित विचार करेल. परंतु, आज सत्ता नसतानाच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष कुंभमेळ्याची खिल्ली उडवत आहेत. उद्या चुकून यांची देशात सत्ता आली, तर भविष्यात होणाऱ्या कुंभमेळ्यावर बंदी घातल्याशिवाय हे राहणार नाहीत. ही भीती आज या देशातील हिंदू धर्मियांच्या मनात निर्माण झाली असल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.