Sarpanch reservation draw announced for 756 Gram Panchayats in Nagpur district : इच्छुकांचा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्याचा मार्ग मोकळा
Nagpur नागपूर जिल्ह्यातील सन २०२५ ते २०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे तालुका निहाय आरक्षण अखेर निश्चित करण्यात आले आहे. ग्राम विकास विभागाच्या शासन शुध्दीपत्रकानुसार आणि सन २०११ च्या जनगणनेच्या आधारे नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) व खुला प्रवर्ग, तसेच या प्रवर्गातील महिलांसाठी ही आरक्षण सोडत निश्चित करण्यात आली असून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या संदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
जिल्ह्यातील एकूण ७५६ सरपंच पदांपैकी १४५ पदे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (OBC) आरक्षित असणार असून त्यातील ७५ पदे मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव असतील. तर खुला प्रवर्गासाठी ३८५ पदे निश्चित करण्यात आली असून त्यापैकी १९५ पदांवर महिलांचा अधिकार राहणार आहे. आरक्षणाची अधिसूचना जाहीर होताच जिल्ह्यातील स्थानिक राजकीय वर्तुळात गती आली असून आगामी निवडणुकांसाठी उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
तालुका निहाय सरपंच पदांचे आरक्षण पुढीलप्रमाणे
काटोल (एकूण ८२ पदे): मागास प्रवर्ग १४ (महिला ७), खुला प्रवर्ग ४१ (महिला २१).
नरखेड (एकूण ७० पदे): मागास प्रवर्ग १६ (महिला ८), खुला प्रवर्ग ३५ (महिला १८).
सावनेर (एकूण ७५ पदे): मागास प्रवर्ग १३ (महिला ७), खुला प्रवर्ग ३८ (महिला १९).
कळमेश्वर (एकूण ५० पदे): मागास प्रवर्ग १२ (महिला ६), खुला प्रवर्ग २५ (महिला १३).
रामटेक (एकूण ४९ पदे): मागास प्रवर्ग ० (महिला ०), खुला प्रवर्ग २५ (महिला १३).
पारशिवनी (एकूण ४७ पदे): मागास प्रवर्ग १२ (महिला ६), खुला प्रवर्ग २४ (महिला १२).
मौदा (एकूण ६३ पदे): मागास प्रवर्ग १७ (महिला ९), खुला प्रवर्ग ३४ (महिला १७).
कामठी (एकूण ४५ पदे): मागास प्रवर्ग १२ (महिला ६), खुला प्रवर्ग २४ (महिला १२).
उमरेड (एकूण ४७ पदे): मागास प्रवर्ग ६ (महिला ३), खुला प्रवर्ग २४ (महिला १२).
भिवापूर (एकूण ५६ पदे): मागास प्रवर्ग ७ (महिला ४), खुला प्रवर्ग २८ (महिला १४).
कुही (एकूण ५९ पदे): मागास प्रवर्ग १५ (महिला ८), खुला प्रवर्ग ३० (महिला १५).
नागपूर ग्रामीण (एकूण ६२ पदे): मागास प्रवर्ग १२ (महिला ६), खुला प्रवर्ग ३१ (महिला १६).
हिंगणा (एकूण ५१ पदे): मागास प्रवर्ग ९ (महिला ५), खुला प्रवर्ग २६ (महिला १३).








