व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Rajendra Shingne : राजेंद्र शिंगणेंचा वनवास संपला, १४ वर्षांनंतर बुलढाणा जिल्हा बँकेच्या...

Rajendra Shingne : राजेंद्र शिंगणेंचा वनवास संपला, १४ वर्षांनंतर बुलढाणा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी

Dr. Rajendra Shingne elected unopposed as chairman of Buldhana District Bank : बिनविरोध निवडीनंतर सत्तेच्या चाव्या हातात, उपाध्यक्षपदी भाजपचे गोविंदराव मिरगे

Buldhana तब्बल १४ वर्षांनंतर बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हाती आल्या आहेत. झालेल्या निवड प्रक्रियेत डॉ. शिंगणे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. तर उपाध्यक्षपदाची जबाबदारी भाजपचे गोविंदराव मिरगे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

जिल्हा बँकेच्या सभागृहात बुधवारी सकाळी ११ वाजता अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्यासह बँकेचे २१ संचालक उपस्थित होते. सर्वानुमते डॉ. राजेंद्र शिंगणे यांची अध्यक्षपदी, तर गोविंदराव मिरगे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. दोन्ही मंत्र्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

Yashomati Thakur : सात दिवसांत उपाययोजना केल्या नाहीतर आंदोलन, यशोमती ठाकूर यांचा सरकारला इशारा

बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील महत्त्वाची आर्थिक संस्था असल्याने अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीकडे सहकार क्षेत्रासह राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले होते. या निवडीत डॉ. शिंगणे यांना भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि काँग्रेसशी संबंधित संचालकांचा पाठिंबा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

सहकार क्षेत्रातील बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये विविध पक्षांच्या संचालकांना एकत्र आणण्यात डॉ. शिंगणे यांना यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) दोन संचालकांनाही सोबत घेणार असल्याचे डॉ. शिंगणे यांनी सांगितले. अध्यक्षपदाच्या निवडीनंतर जिल्ह्यातील सहकार आणि राजकारणातील समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!