व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जरांगे यांनी रितसर तक्रार करावी, आम्ही चौकशीस तयार

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जरांगे यांनी रितसर तक्रार करावी, आम्ही चौकशीस तयार

५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवरून राजकारण तापले

Nagpur मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या ५०० कोटींच्या गंभीर आरोपांनंतर आणि त्यानंतर समोर आलेल्या एका कथित ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, आता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया देत चौकशीची तयारी दर्शवली आहे.

दसरा मेळाव्यात बोलताना, भाजपच्या नेत्यांकडून ५०० कोटी रुपये गोळा करून ते आपल्याला देण्याचा प्रयत्न झाल्याचा खळबळजनक आरोप मनोज जरांगे यांनी केला होता. त्यानंतर शिंदे गटाच्या मागणीनुसार जरांगे यांनी माध्यमांसमोर एक ऑडिओ क्लिप ऐकवली. यामध्ये दहा-बारा जण आपसात बोलत असून, जरांगे यांना ५०० कोटी रुपये दिल्याची आणि ही रक्कम खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत पोहोचल्याची चर्चा असल्याचे ऐकायला मिळते.

सावकारीच्या विळख्यात ग्रामीण महाराष्ट्राची चिंता वाढली!

शिंदे गटाने यावर आक्रमक पवित्रा घेत ही ऑडिओ क्लिप अडीच वर्षे जुनी असून ती आताच का बाहेर काढली? असा सवाल केला आहे. एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा आणि मराठा समाजात फूट पाडण्याचा हा जाणीवपूर्वक रचलेला कट असल्याचा दावा शिंदे सेनेचे नेते एकनाथ कदम यांनी केला आहे.

या संपूर्ण वादावर बोलताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, मनोज जरांगे जे काही बोलले ते त्यांना लखलाभ. त्यांनी आमच्याकडे रितसर तक्रार करावी, सरकार या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यास पूर्णपणे तयार आहे. या प्रकरणामुळे आगामी राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात असून, या कथित ऑडिओ क्लिपमागील सत्य काय, हे आता चौकशीनंतरच समोर येईल.

 

error: Content is protected !!