Uddhav Balasaheb Thackeray Shivsena : नाफेड खरेदी केंद्रांना मुदतवाढ द्या

 

Extend the deadline for NAFED purchase centres : उद्धव गटाची मागणी; आंदोलनाचा इशारा

Buldhana नाफेड अंतर्गत सुरू असलेल्या शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रांच्या मुदतीत वाढ करण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी दिला आहे. या मागणीसाठी बुधवत यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

अलीकडेच बारदान्याच्या (गोण्यांच्या) कमतरतेमुळे अनेक खरेदी केंद्रांचे काम ठप्प झाले होते. आता, खरेदी केंद्रांची मुदत संपत आल्याने शेतकऱ्यांच्या घरातील संपूर्ण सोयाबीन खरेदी होईपर्यंत केंद्रे सुरू ठेवण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

Forest Department of Maharashtra : दहशत पसरविणाऱ्या बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू

यावेळी जालिंदर बुधवत म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या घरात मोठ्या प्रमाणात सोयाबीन शिल्लक आहे. बाजारात योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. बारदान्याअभावी खरेदी प्रक्रियेत अडथळे आले होते, तर आता शासकीय खरेदी केंद्रांची मुदत संपत आली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या संपूर्ण मालाची खरेदी होईपर्यंत केंद्रे सुरू ठेवावीत, अशी आमची मागणी आहे.’

नाफेडच्या शासकीय खरेदी प्रक्रियेत अनेक अडचणी निर्माण होत आहे. हे स्पष्ट दिसून येत आहे. Moisture (ओलसरपणा), काडी-कचरा, फुटलेले दाणे, डाग पडलेले सोयाबीन यासारख्या कारणांवरून शेतकऱ्यांचा माल नाकारला जात आहे. तसेच संथगतीने खरेदी होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना आपला माल विक्रीस आणणे कठीण झाले आहे.

Terrible reality of the education system : आठवीच्या विद्यार्थ्यांना येत नाही दुसऱ्या वर्गाचं गणीत!

बुधवत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ न दिल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडले जाईल. शेतकऱ्यांचा संपूर्ण माल खरेदी होईपर्यंत केंद्र बंद होता कामा नयेत, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी तालुका प्रमुख लखन गाडेकर, विजय इंगळे, किसान सेना उपजिल्हाप्रमुख अशोक गव्हाणे, माजी सभापती सुधाकर आघाव, युवासेना तालुका प्रमुख संजय शिंदे, अपंग सेल प्रमुख गणेश सोनुने, दलित आघाडी तालुका प्रमुख बबन खरे, बाजार समिती संचालक हरी सिनकर, खरेदी-विक्री संघ अध्यक्ष रामेश्वर शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.