Remove encroachment on all government places : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्ट निर्देश
Nagpur शहरासह संपूर्ण जिल्ह्यात विविध विभागांच्या शासकीय जागांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, मनपा, जिल्हाधिकारी, एनआयटीसह विविध शासकीय जागांवर झालेले अतिक्रमण काढण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी डीपीसीच्या बैठकीत दिले.
शासकीय जागांवरील अतिक्रमण शोधण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे तसेच या समितीला महिनाभरात आपला अहवाल सादर करण्यास त्यांनी सांगितले आहे. आमदार विकास ठाकरे यांनी शहरासह जिल्ह्यातील भूमाफियांचा मुद्दा उपस्थित केला.
जिल्ह्यासह शहरात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, एनआयटी, एमएमआरडीएसह शासकीय जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. फुटाळा तलावाजवळ अतिक्रमण आहे. शहरात हे भूमाफिया तयार होत आहेत, याबाबत चौकशी करत कारवाईची मागणी आमदार ठाकरे यांनी केली.
Chandrashekhar Bawankule : जिल्ह्यातील प्रत्येक शाळा होणार डिजीटल
त्यावर बोलताना महसूलमंत्री तथा पालकमंत्री बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्याची घोषणा केली. तसेच नासुप्र, मनपासह सर्व विभागांनी आपापल्या विभागाच्या जागेवर असलेल्या अतिक्रमणाची माहिती या समितीकडे सादर करण्याच्या सूचना केल्या. ही समिती महिनाभरात सर्व लेखाजोखा सादर करेल. त्यानंतर सर्व अतिक्रमण एकाचवेळी काढण्याची कारवाई केली जाईल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
Dr. Pankaj Bhoyar : प्रदर्शनातून घडावेत भविष्यातील वैज्ञानिक
२० ते २५ वर्षांपासून बांधकाम असलेल्या नागरिकांना आरएल मिळत नसल्याचा मुद्दा आ. विकास ठाकरे यांनी उपस्थित केला. त्यावर पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, अशा प्रकरणात बांधकामावर ज्यांची मालकी आहे, त्यांना आरएल देण्याची योजना आहे. यासाठी समिती स्थापन होणार आहे. यासाठी एनएमआरडीएने एक आराखडा तयार करून ठेवावा, असे स्पष्ट केले.
गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी नवीन पोलिस ठाण्यासोबत नवीन पोलिस चौकी तयार करा. त्यासाठी हद्दची नव्याने रचना करा. सध्या पाच पोलिस उपायुक्त (डीसीपी) झोन आहेत. कामठीसाठी सहावा डीसीपी झोन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्याचप्रमाणे कळमना, भांडेवाडी, गरोबा मैदान पोलिस ठाण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी केल्या.