‘Ajit Parv’ campaign will strengthen the party : राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी साधला संवाद
Buldhana राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित दादा गट) मजबूत करण्याच्या उद्देशाने ‘अजित पर्व’ अभियानाची सुरुवात झाली आहे. ७ फेब्रुवारी रोजी बुलडाणा जिल्ह्यात अभियानाने प्रवेश केला. या अंतर्गत सिंदखेडराजा येथे जिजाऊ माँ साहेबांचे दर्शन घेण्यात आले. पुढे देऊळगाव राजा येथे पक्षाच्यावतीने विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी युवकांना राजकारणात सक्रिय होण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, युवकांनी समाजसेवेत पुढे येऊन पक्ष संघटन मजबुतीसाठी योगदान द्यावे. अजित पर्व अभियानाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिक बळकटी मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Maharashtra Jeevan Pradhikaran : ग्रामपंचायतचा निष्काळजीपणा; ३० गावांची पाणीकोंडी!
स्थानिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष मनिष बोरकर आणि पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना अॅड. नाझेर काझी यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हाभर कार्यरत आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पालिका निवडणुकांमध्ये पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
युवक मेळाव्यात उपस्थित मान्यवरांनी पक्षाच्या वाढीसाठी युवकांनी योगदान द्यावे आणि सदस्य नोंदणी मोहिमेला गती द्यावी, असे आवाहन केले. पक्षाची ताकद वाढविण्यासाठी युवकांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. पत्रकार परिषदेत युवक जिल्हाध्यक्ष मनिष बोरकर यांनी विस्तृत माहिती देत उपस्थितांचे स्वागत केले.