Majhi Vasundhara : नागपूर विभागातून आंजी ग्रामपंचायतने मारली बाजी

Anji Gram Panchayat stands first in Nagpur division : राज्य सरकारच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानात अव्वल

Wardha पर्यावरणाचे जतन, संवर्धन व संरक्षण करण्यासाठी ‘माझी वसुंधरा’ हा अभिनव उपक्रम शासनाच्या वतीने राबविला जातो. गेल्यावर्षी ‘माझी वसुंधरा-४.० अभियान’ राबविण्यात आले. यामध्ये वर्धा तालुक्यातील आंजी (मोठी) ग्रामपंचायतीने नागपूर विभागातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

या ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच जगदीश संचेरिया आणि ग्रामविकास अधिकारी एच. एम. राठोड यांची संकल्पना अंमलात आणली गेली. त्यात गावकरी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या पंचमहाभुतांच्या घटकावर लक्ष केंद्रित करण्यात आले. आणि परिसर हिरवळीने नटला.

Shivaji Maharaj Jayanti : ढोलताशा, आदिवासी नृत्यातून महाराजांना वंदन!

त्यामुळे गावातीलही पर्यावरणाचा समतोल राखता आला. आता या यशामुळे विकासात्मक समतोलही साधला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनासह गावकऱ्यांचेही कौतुक होत आहे. गावात ऑक्सिजन पार्कसारखे नवीन हरित क्षेत्र तयार करण्यात आले आहे. त्याचे संवर्धनही केले जात आहे. यासोबतच वृक्षलागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी रोपवाटिकेची निर्मिती केली आहे.

विद्युत वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी गावात मोफत विद्युत चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. ग्रामपंचायतची मालकी असलेल्या इमारतीवर रेनवॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसविण्यात आली. इतकेच नव्हे तर सणासुदीच्या दिवसात होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी गावात कृत्रिम विसर्जन कुंडाची उभारणी केली.

शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य देऊन डोंगराळ भागात खंदक तयार करून पाणी अडवून वृक्षारोपण करण्यात आले. याशिवाय शेतकऱ्यांना शेतीपैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर ठिंबक सिंचनाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे पाण्याचीही बचत होऊन उत्पादनातही वाढ झाली.

Dharmapal Meshram : चार वर्षांत किती विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले?

ग्रामपंचायतीच्या हद्दीत एलईडी पथदिवे लावून ऊर्जाबचत करण्यात यश मिळविले. पर्यावरण सेवा योजनांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घेण्यात आला. गावातील सार्वजनिक ठिकाणी माझी वसुंधरा तत्त्वे दर्शविणाऱ्या बाबींच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसिद्धी करण्यात आली. यामुळे ग्रामपंचायत आज विभागीय स्तरावर अव्वल ठरली.