Breaking

Devendra Fadanvis : ‘फिक्सर’ लोकांना अजिबात मान्यता देणार नाही !

Chief minister says Fixers will not be allowed : आत्तापर्यंत निश्चित झाली १०९ नावे

Nagpur : कॅबिनेटच्या बैठकीत मी अगोदरच सांगितलं होतं. तुम्हाला पाहिजे ती नावे पाठवा. मात्र ज्याचे नाव फिक्सर म्हणून किंवा चुकीच्या कामांत आहे, त्यांना मी मान्यता देणार नाही. कोणीही नाराज झाले तरीही चालेल. पण त्याला मान्यता देणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.

नागपुरात आज (२४ फेब्रुवारी) पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आतापर्यंत 125 च्या जवळपास नावे आली आहेत. त्यांतून १०९ नावे क्लिअर झाली आहेत. मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पीएच्या नियुक्तीबद्दल विचारले असता, ते म्हणाले, त्यांना कदाचित माहिती नसेल. पण पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो. मंत्री मुख्यमंत्र्याकडे प्रस्ताव पाठवतात आणि अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतात. हे काही नव्याने होत नाहीये.

Central Government : डाव्या संघटनांचे २५ कोटी कामगार उतरणार रस्त्यावर!

पयरे यांनी अननियमित्ता शोधून काढली आहे. प्रचंड मोठी अनियमितता आहे. मुलांना शिक्षण मिळत नसून काही लोक पैसे लाटत आहेत. याची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री आशिष जैस्वाल या प्रकरणात लक्ष घालून आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. ठाणे, कल्याणमधील अतिक्रमणाबाबत विचारले असता, बिल्डर लोक कारस्थान करून अनियमित बांधकाम करून कोर्टात पाठवतात , हे धंदे आहेत. यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी या प्रकरणातील वास्तव नजरेत आणून दिल. आता कोर्टात इंटरवेंशन करू, असे त्यांनी सांगितले.

माढ्यामध्ये मुस्लीमांच्या व्यवसायांवर बंदी घातली जात आहे, यावर ही बंदी जातीने किंवा धर्माने घातलेली नाही तर नियम पाळत नसल्यामुळे बंदी आणली आहे. त्या संदर्भात मला अजून पूर्ण माहिती नाही. माझी ऐकीव माहिती आहे. पूर्ण माहिती घेईल आणि त्यानंतर त्यावर मी बोलेन, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Devendra Fadanvis : अशोक उईकेंनी मंत्रिमंडळ बैठकीत आणली मोहाची दारू, मग फडणवीसांनी असे काही केले की..

शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांचे निवेदन दिले. शक्तीपीठ मार्ग करा, अशा पद्धतीचे निवेदन मला दिले आहे. कोल्हापूरचा विरोध पत्करून महामार्ग करणार नाही. तर सगळ्यांना त्याचे फायदे सांगून सगळ्यांना विश्वासात घेऊन तो मार्ग करणार आहोत.

राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील, अशा चर्चा सुरू आहेत. याबद्दल विचारले असता, त्यावर मी काही बोलत नाही. पण कुठेतरी सुसंवाद होत असेल. तर मी त्याचं स्वागत करेल. विसंवाद असू नये. सगळ्यांनी सुसंवाद करावा. आपणही सकाळी नऊ वाजताच्या भोंग्यातून सुसंवाद कसा करायचा, हे शिकवलं पाहिजे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.