Breaking

Accident in Nagpur : आईने छातीशी कवटाळले, पण बाळाचा मृत्यू झाला होता !

Nine months old baby dies in accident : शांतीनगरच्या अपघाताने समाजमन हेलावले; तिघे गंभीर जखमी

Nagpur भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. दुचाकीवर असलेले पती-पत्नी, सात वर्षांचा मुलगा आणि नऊ महिन्यांचं बाळ लांब फेकले गेले. बाळाचं डोकं डिव्हायडरवर आपटलं. बाकी तिघांनाही जोरदार मार लागला. आईनं काळजीमुळे बाळाला छातीशी कवटाळले. पण तोपर्यंत बाळाची प्राणज्योत मालवली होती. आई धाय मोकलून रडत होती. अपघातामुळे तिला झालेल्या जखमांच्या वेदना रक्तबंबाळ बाळापुढे गळून पडल्या होत्या.

चौघेही महिलेच्या माहेरी जेवण करायला गेले होते. रात्री बारा वाजता दुचाकीने परत घराकडे निघाले. मात्र, रस्त्यातच घात झाला. एका भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या विचित्र अपघातात पती, महिला, मुलगा व तिचे ९ महिन्यांचे बाळ रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात दुभाजकाचा मार लागल्यामुळे बाळ रक्तबंबाळ झाले. स्वत: जखमी असतानाही महिलेने बाळाला छातीशी कवटाळले. मात्र, काही क्षणातच बाळाचा श्वास बंद झाला.

Nagpur Police : पहिले पोलिसांना Lightly घेतले, मग तरुणीची सिट्टी पिट्टी गुम!

अपघातग्रस्त कुटुंबाचा रस्त्यावर आक्रोश सुरु होता. तब्बल अर्धा तासानंतर एका वाहनचालकाने त्यांना मदत केली. जखमींना मेयो रुग्णालयात दाखल केले. पती-पत्नी व ७ वर्षीय मुलावर उपचार सुरु आहेत. ९ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवाने मृत्यू झाला. मुनाहीद शेख असे अपघातातील मृतक बाळाचे नाव आहे. तर मुस्कान अंजूम, मुस्ताक शेख आणि मुलगा मिर्झान अशी जखमींची नावे आहेत.

माजरी, भिलगाव येथील शेख मुस्ताक शेख मोईन हे पत्नी मुस्कान अंजूम, ९ महिन्यांचा मुलगा मुनाहादीन शेख आणि मिर्झान शेख (७) यांच्यासह राहायचे. मुस्ताक शेख हे कुटुंबीयांसह रविवारी दुचाकीने (एमएच ४९ सीबी ७७४६) शांतीनगर येथे सासुरवाडीला गेले होते. तेथे जेवण केल्यानंतर रात्री ११.३० वाजताच्या सुमारास पत्नी व दोन मुलांना घेऊन घराकडे परत निघाले. ते दहीबाजार पुलाजवळ आल्यानंतर मेहंदीबाग पुलाकडे जात होते.

Nagpur Police : उडता नागपूर! ड्रग्स तस्करीचं संकट कायम

या रस्त्यावरील सतरंजीपुरा विभागीय कार्यालयासमोर रस्ता ओलांडत होते. यादरम्यान, दही बाजार पुलाकडून भरधाव कार त्यांच्या दिशेने आली. कारचालकाने मुस्ताक शेख यांच्या वाहनाला मागून धडक दिली आणि पळून गेला. अपघातात ते चौघेही दुभाजकावर फेकले गेले. पत्नी मुस्कान अंजूम आणि ९ महिन्यांचा मुनाहीद हे दोघे गंभीर जखमी झाले तर मुस्ताक आणि ७ वर्षीय मिर्झान हे दोघे किरकोळ जखमी झाले.

नऊ महिन्यांचा मुनाहीद हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मुस्कानने जखमी असतानाही बाळाला कवेत घेतले. मात्र, काही वेळातच बाळाची हालचाल थांबली. या अपघातानंतर तब्बल अर्धा तास मदत मिळाली नाही. दरम्यान,एका वाहनचालकाने अपघातग्रस्त कुटुंबाला मेयो रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी मुलगा मुनाहीद शेख याला मृत घोषित केले. तर मुस्कान यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मुस्ताक शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राम बारोडे यांनी अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.