Tree cutting in Nagpur with permission of the Municipal Corporation : २० हजारांवर वृक्षताेड झाल्याचा पर्यावरणवाद्यांचा आरोप
Nagpur गेल्या दाेन महिन्यांत काही प्रकल्पांसाठी २००० हून अधिक झाडांच्या कत्तलीसाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने परवानगी दिली आहे. अवैध वृक्षताेडीची गणतीच नाही. अशाप्रकारे वर्षभरात नागपूर शहरात २० हजारांहून अधिक झाडांची कत्तल झाली आहे. शेकडाे तक्रारी असताना, सुनावणीची केवळ औपचारिकता करणारा उद्यान विभाग मुका, बहिरा अन् आंधळा हाेऊन बसला आहे, असा गंभीर आराेप नागपूरच्या पर्यावरणवाद्यांनी केला आहे.
वृक्ष संरक्षण व संवर्धन कायदा १९७५ व २०२१ च्या सुधारीत कायद्याला फाट्यावर बसवून शहरात राजराेसपणे दरराेज झाडांची कटाई हाेत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, मानकापूर स्टेडियम परिसर, मेडिकल काॅलेज, आयुर्वेदिक काॅलेज व इतर काही प्रकल्पांत झाडांचे कत्तल हाेत आहे. विशेष म्हणजे उद्यान विभागाने वर्तमानपत्रात नाेटीस प्रकाशित करून आक्षेप मागविले जातात. पण सुनावणीच्या नावावर केवळ औपचारिकता असते, झाडे वाचविण्याचा हेतू नसताे.
Local Body Elections : निर्णय लांबणीवर, इच्छुकांची वाढली चिंता!
वास्तविकतेत सुनावणी हाेण्यापूर्वी बहुतेक प्रकरणांत परवानगी गृहित धरूनच बांधकाम सुरू करून वृक्षताेड केली जाते. शासकीय प्रकल्पांसह आता खासगी कंत्राटदारांकडूनही वृक्षताेडीच्या परवानगीची औपचारिकता पूर्ण करून बांधकाम सुरू करण्यात येते. हा सगळा प्रकार संतापजनक आणि भविष्यात नागपूरच्या प्रदूषण वाढीला कारणीभूत ठरणारा आहे. सरकारच पर्यावरण संवर्धनाबाबत गंभीर नाही, असा आराेप यावेळी करण्यात आला.
गेल्या वर्षभरात पर्यावरण कार्यकर्ते, वृक्षप्रेमी नागरिकांनी हजाराे तक्रारी मनपाच्या उद्यान विभागाला दिल्या आहेत. दुसरीकडे पाेलिस विभागाकडेही तक्रारी देण्यात येतात. वर्षभरात वृक्षताेड करणाऱ्यांविराेधात शेकडाे एफआयआर करण्यात आल्या आहेत. मात्र, एकाही प्रकरणात कारवाई झाली नाही, हाेत नाही.
Prashant Koratkar : कोरटकरच्या घरापुढे आंदोलन; अडचणी वाढल्या!
पत्रपरिषदेत ज्येष्ठ पर्यावरणवादी शरद पालिवाल, आशुताेष दाभाेळकर, जयदीप दास, अनसूया काळे-छाबरानी, सचिन खाेब्रागडे, सुनील पडाेळे, सुरज श्रीवास्तव, मृणाल चक्रवर्ती आदी उपस्थित हाेते.








