Breaking

Co-operative sector : सहकार क्षेत्रात रंगला कलगीतुरा!

Controversy over transfer of District Monitoring Office : जिल्हा देखरेख कार्यालय स्थानांतरावरून वाद

Amravati जिल्हा देखरेख सहकारी संस्था (अचलपूर शाखा) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थानिक क्षेत्रीय शाखेत हलविण्याच्या निर्णयावरून सहकार क्षेत्रात कलगीतुरा रंगला आहे. हा निर्णय मागे घेतला नाही, तर बाजार समितीमध्ये सुरू असलेल्या ५० सोसायट्यांची कार्यालये गावात हलविण्यासाठी प्रयत्न करू. असे थेट आव्हान काँग्रेसचे पदाधिकारी कैलास आवारे यांनी दिले आहे.

तालुक्यातील ५० सोसायट्यांचे प्रशासन मागील तीन दशकांपासून बाजार समितीमधील जिल्हा देखरेख सहकारी संस्थेच्या स्थानिक शाखेतून चालवले जात आहे. मात्र, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आनंद काळे यांच्या प्रयत्नाने हे कार्यालय जिल्हा बँकेत हलविण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नुकताच घेतला आहे.

Irrigation Department in action mode : पाटबंधारे विभाग करणार पालिकेची कोंडी!

या निर्णयाला विरोध दर्शवताना कैलास आवारे म्हणाले, “सोसायट्या या स्वायत्त संस्था आहेत. त्या प्रशासकीयदृष्ट्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संलग्न असल्या, तरी बँकेला त्यांच्यावर थेट नियंत्रण ठेवण्याचा अधिकार नाही. सोसायट्यांच्या भरवशावरच बँकेचा कारभार चालतो. जर हा निर्णय रद्द केला गेला नाही, तर आम्ही आंदोलन करू.”

बाजार समितीमधील सोसायट्यांच्या कार्यालयामुळे शेतकऱ्यांना सहज सुविधा मिळतात. त्यासाठी आर्थिकदृष्ट्या हे ठिकाण सोयीचे आहे. *’देशोन्नती’*मध्ये १ मार्च २०२५ रोजी सदर कार्यालय स्थानांतरित करण्याच्या निर्णयाविषयी वृत्त प्रसिद्ध होताच, अनेकांच्या भुवया उंचावल्या. यामागे राजकीय हेतू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

या मुद्यावर प्रतिक्रिया देताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आनंद काळे म्हणाले, “जिल्हा देखरेख सहकारी संस्थेच्या स्थानिक शाखेचे कार्यालय बँकेच्या इमारतीत हलविण्याचा निर्णय योग्यच आहे. त्यामुळे कामकाज अधिक सुसूत्र होईल. हा निर्णय आम्ही मागे घेणार नाही. सोसायट्यांनी त्यांचे कार्यालय कुठे असावे, हे त्यांनी ठरवावे. आमच्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप सहन केला जाणार नाही.”

Crime in Amravati : अमरावतीत युवकाची हत्या; शहरात तणावाचे वातावरण!

दरम्यान, जिल्हा देखरेख सहकारी संस्थेच्या स्थानिक शाखेच्या सभापतीपदावर राजेंद्र गोरले यांच्या राजीनाम्यानंतर प्रशांत ठाकरे यांच्या पत्नी सौ. प्रतिभाताई ठाकरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.