Restlessness among BJP leaders in West Nagpur : सुधाकर कोहळेंच्या सक्रियतेने अनेकांमध्ये नाराजी
Nagpur विधानसभा निवडणुकीच्या उमेदवार निवडीवरून नागपूरच्या भाजपमध्ये बरेच उणेदुणे झाले. पश्चिम नागपूर मतदारसंघात तर दक्षिणमधून आयात उमेदवार सुधाकर कोहळेंना संधी दिल्याने अनेकांना खटकले होते. पण आता निवडणूक संपून तीन महिने झाल्यानंतरही सुधाकर कोहळे पश्चिम नागपुरात ठाण मांडून आहेत. त्यामुळे नाराजीची वात विझलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुधाकर कोहळे यांनी विधानसभेत दक्षिण नागपूरचे प्रतिनिधीत्व केले आहे. पण २०१९च्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळाली नाही. २०२४मध्ये उमेदवारी मिळेल, अशी त्यांना आशा होती. पण असे असताना त्यांना अचानकपणे पश्चिम नागपुरातून उमेदवारी देण्यात आली. दुसरीकडे पश्चिम नागपुरात उमेदवारीसाठी माजी महापौर संदीप जोशी, दयाशंकर तिवारी व माजी नगरसेवक रमेश चोपडे इच्छुक होते.
Nitin Gadkari : गडकरींच्या तंबीनंतर धावपट्टीचे काम पूर्ण; 1 एप्रिलपासून २४ तास सेवा
यातील संदीप जोशी Sandip Joshi हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांच्या विश्वासातील मानले जातात. या सर्वांना डावलून दक्षिण नागपुरातील कोहळे यांना पश्चिम नागपुरातील शंकरपटात विकास ठाकरे यांच्या विरोधात उभे केले. अपेक्षेप्रमाणे कोहळे यांचा पराभव झाला.
येथे पहिला अंक संपला होता. परंतु कोहळे यांनी पश्चिम नागपुरात किरायाने घेतलेले घर सोडले नाही. त्यांनी आपला अस्थायी तंबूचा खुंटा पुन्हा भक्कम करण्याचा प्रण केल्याचे दिसून येते. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर कोहळे दक्षिणचा रस्ता धरतील, अशी अपेक्षा माजी इच्छुकांना होती. शिवाय त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची देखील जबाबदारी आहे.
Sajid Khan Pathan : रुग्णालयाच्या इमारतींचे निकृष्ट दर्जाचे काम सभागृहात गाजणार
मात्र त्यांनी पश्चिममधून अद्याप आपले बस्तान हलवलेले नाही. निवडणुकीच्या दृष्टीने पश्चिम नागपुरात भाड्याने घेतलेल्या घरात सुधाकर कोहळे किमान पंधरा दिवसांनी एक जनता दरबार घेतात. लोकांच्या समस्या जाणून घेतात. पश्चिम नागपुरात भाजपचे कार्यालय आहे. परंतु या कार्यालयात कोहळे अपवादानेच फिरकतात. भाड्याच्या घरातून ते पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात जनसंपर्काचा रथ हाकण्याचे काम करीत आहेत.
त्यांच्या या सक्रियतेने इच्छुकांच्या मनात पुन्हा पाल चुकचुकली आहे. निवडणूक संपल्यानंतरही कोहळे यांची सक्रियता २०२९ च्या निवडणुकीची तयारी आहे का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसा त्यांना शब्द दिला आहे का? असे प्रश्न इच्छुकांच्या मनात निर्माण झाले आहेत. निवडणुकीनंतर सर्व काही आलबेल होईल, असे पश्चिम नागपूर भाजपात बोलले जात होते. उमेदवारीनंतर निर्माण झालेले मतभेद निवडणुकीनंतर संपून सौहार्दाचे वातावरण तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांना होता.
Irrigation Department in action mode : पाटबंधारे विभाग करणार पालिकेची कोंडी!
परंतु, कोहळे यांच्या सक्रियतेमुळे पश्चिम नागपुरातील भाजपमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे नेत्यांमधील नाराजीचा वणवा विझलेला नसल्याचे दिसून येत असल्याचे बोलले जात आहे. अगदी अलीकडचं उदाहरण द्यायचं झाल्यास १८ व २२ फेब्रुवारी असे चार दिवसांत दोन जनसंवाद कार्यक्रम कोहळेंनी पश्चिम नागपुरातील घरी आयोजित केले होते.








