Wardha Police : ट्रॅव्हलर बॅगमधून गांजाची विक्री, एकाला अटक!

 

One arrested for selling Ganja from a traveler’s bag : वर्धा पोलिसांकडून ८.७७५ ग्राम गांजा जप्त

Wardha ट्रॅव्हलर बॅगमध्ये गांजा ठेवून त्याची घरून किरकोळ विक्री करणाऱ्या दोघांवर पोलिसांनी गुन्हा नोंद करीत एकाला अटक केली. त्याच्या ताब्यातून ८ किलो ७७५ ग्रॅम अमली पदार्थ गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने संत गोमाजी वार्ड हिंगणघाट येथे केली. जुबेर गुलजार खान पठाण (वय ३५) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर शाहरूख सरदार खान पठाण हा आरोपी फरार आहे.

दोन्ही गोमाजी वाॅर्ड हिंगणघाट येथील राहणारे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक हिंगणघाट परिसरात अवैध व्यवसायावर कारवाईसाठी गस्तीवर होते. दरम्यान, पोलिसांना हिंगणघाट शहरात गांजा विक्री करणारा सराईत शाहरूख सरदार खान पठाण याने मोठ्या प्रमाणात गांजा अंमली पदार्थ आणला आहे. त्याचा चुलतभाऊ जुबेर गुलजार खान पठाण याच्या घरी तो ठेवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारावर पोलिसांनी छापा टाकला असता जुबेर गुलजार खान पठाण याच्या घराची झडती घेण्यात आली.

Cyber Crime : आठ वर्षांत एकाच माणसाला ५० सायबर गुन्हेगारांनी गंडवले!

शाहरूख सरदार खान पठाण याने आणून ठेवलेल्या ट्रॅव्हलर बॅगमध्ये मिळून आला. वजन केले असता ८ किलो ७७५ ग्रॅम असा एक लाख ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी जुबेर गुलजार खान पठाण यास त्याचे घरझडतीतून मिळालेल्या ‘गांजा’ बाबत चौकशी केली असता शाहरूख सरदार खान पठाण (रा. संत गोमाजी वार्ड हिंगणघाट) हा गांजा विक्री करतो.

Crime in Akola : अकोल्यात ‘नीट’च्या विद्यार्थ्याची आत्महत्या

त्यानेच दोन दिवसांपूर्वी घरी गांजा भरून असलेली बॅग आणून ठेवलेली असल्याची कबुली दिली. सध्या तो त्याचे घरी नाही असे सांगितले. यावरून जुबेर गुलजार खान पठाण, शाहरूख सरदार खान पठाण, (रा. संत गोमाजी वार्ड हिंगणघाट) यांचे विरुद्ध पोलिस ठाणे हिंगणघाट येथे एन.डी.पी.एस. ॲक्टचे विविध कलमांन्वये गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.