Breaking

Akola Cyber ​​Cell : अकोला पोलिसांकडून सायबर पेट्रोलिंग; ४१ आक्षेपार्ह पोस्ट हटवल्या

 

Cyber ​​patrolling by Akola Police; 41 objectionable posts deleted : सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर

Akola आजच्या युगात इंटरनेट आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. दैनंदिन जीवनातील अनेक व्यवहार इंटरनेटच्या माध्यमातून पार पडतात, जसे की आर्थिक व्यवहार, बँकिंग, व्यवसाय, शिक्षण, वैद्यकीय सेवा आणि जनसंपर्क. इंटरनेटमुळे मानवी जीवन सुलभ झाले आहे. असे असले तरी त्याच्या अयोग्य वापरामुळे अनेक धोकेही उद्भवू शकतात. त्यामुळे इंटरनेटचा सुरक्षित आणि जबाबदारीने वापर करणे आवश्यक आहे.

सोशल मीडियाच्या वाढत्या वापराचा विचार करता नागरिकांनी, विद्यार्थी वर्गाने आणि युवकांनी त्याचा सकारात्मक उपयोग करावा. कोणतीही पोस्ट, फोटो किंवा व्हिडिओ सत्यता न पडताळता शेअर करू नयेत. अन्यथा त्यातून गंभीर परिणाम होऊ शकतात.

 

Cyber Crime : आठ वर्षांत एकाच माणसाला ५० सायबर गुन्हेगारांनी गंडवले!

अकोला सायबल सेलकडून ८५ आक्षेपार्ह पोस्टपैकी ४१ हटविण्यात आल्या आहेत. सायबर सेलने मागील वर्षभरात सोशल मीडियावर सतत मॉनिटरिंग करून आक्षेपार्ह पोस्ट शोधून काढल्या. त्यामध्ये फेसबुक – ४, ट्विटर – ३२ आणि इंस्टाग्रामवरील ४९ पोस्टचा समावेश आहे. एकूण ८५ आक्षेपार्ह पोस्ट सापडल्या.

या पोस्टमध्ये धार्मिक भावना दुखावणाऱ्या, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या, राजकीय व आक्षेपार्ह पोस्ट, तसेच गुंडगिरीला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट व रिल्स (३०२, ३०७, भाईगिरी, हातात तलवार, पिस्तुल, शस्त्रे हाताळणाऱ्या) पोस्टचा समावेश होता.

चार जणांविरुद्ध कारवाई..
सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरुण व विद्यार्थी वर्गातील काही व्यक्ती शस्त्र हातात घेऊन रिल्स तयार करून त्या सोशल मीडियावर पोस्ट करतात. अशा प्रकारच्या चार जणांविरुद्ध अकोला पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. संबंधितांना समज देऊन त्यांच्याकडील व्हिडिओ डिलीट करण्यात आले आहेत.

Cyber crime : एम्सच्या डॉक्टरने link वर click केले, लाखो रुपये गायब!

पोलीसांचे नागरिकांना आवाहन.                                                                                          अकोला जिल्ह्याशी संबंधित अशा आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास नागरिकांनी अकोला पोलिसांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले त्यासाठी ट्विटर – @akolapolice, फेसबुक – @akolapolice आणि इंस्टाग्राम – @police_akola चा वापर करावा, असेही कळवण्यात आले आहे.

सोशल मीडियाचा योग्य वापर करावा. कोणाच्याही भावना दुखावणाऱ्या किंवा जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट, फोटो, व्हिडिओ अपलोड करू नयेत, असे आवाहन अकोल्याचे पोलीस अधीक्षक यांनी केले आहे.