Breaking

Protest in Amravati : गुन्हे दाखल असूनही शिक्षक बँक संचालक मंडळ कार्यरत

Shikshak Bank board of directors is functioning despite criminal cases : विकास आघाडीचा सवाल, बरखास्तीच्या मागणीसाठी धरणे आंदोलन

Amravati अचलपूर जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेतील हुकूमशाही व बेकायदेशीर कारभाराच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत. विभागीय सहनिबंधकांनी नियंत्रक म्हणून याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शिक्षक बँक विकास आघाडीने जोरदार आंदोलन उभारले. या आंदोलनादरम्यान, पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले शिक्षक बँकेचे संचालक मंडळ त्वरित बरखास्त करावे, अशी मागणी सभासदांनी सहकार कायदा कलम ७९ अन्वये केली.

शिक्षक बँक ही सहकार कायद्यानुसार पगारदार कर्मचाऱ्यांसाठी असलेली सहकारी बँक आहे. मात्र, विद्यमान अध्यक्षांनी निवृत्तीनंतरही पदाला चिकटून राहण्यासाठी बँकेला नागरी बँक बनवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. सेवानिवृत्त झालेल्या काही कथित नेत्यांनी विभागीय सहनिबंधकांवर दबाव टाकून बँकेवर नियंत्रण मिळवण्याचे कटकारस्थान रचल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

MLA Manoj Kayande : पाणी टंचाईच्या बैठकीला अधिकाऱ्यांचा दुष्काळ!

बँकेमध्ये ४३ पदांसाठी बेकायदेशीर नोकरभरती करण्यात आली असून, या प्रकरणात अध्यक्ष, विद्यमान संचालक मंडळ आणि सोलापूर नागरी सहकारी बँक असोसिएशनविरोधात अमरावती पोलिसांनी १३ डिसेंबर २०२४ रोजी ४२०, १२० (ब) अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. यासोबतच,

सहकार कायदा कलम ७९ अन्वये संचालक मंडळ तत्काळ बरखास्त करावे. उपविधी १०-अ (३) सुमोटो दुरुस्त करण्यासाठी सुरू असलेली प्रक्रिया थांबवावी. नियमबाह्य खरेदी केलेल्या इनोवा गाडीच्या व्यवहाराची चौकशी करावी. बाहेर जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेल्या सर्व कर्ज प्रकरणांची चौकशी व्हावी. बँकेच्या मासिक सभेचे इतिवृत्त सार्वजनिक करण्याचे आदेश द्यावेत. बँकेच्या निविदा प्रक्रियेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहारांची सखोल चौकशी करावी. रिझर्व्ह बँक आणि महाराष्ट्र शासनाचे शासकीय ऑडिट तातडीने करावे, या मागण्या करण्यात आल्या.

Dilip Sananda : दिलीप सानंदाही काँग्रेस सोडण्याच्या मार्गावर?

बँकेच्या कारभारावर नाराज असलेल्या शिक्षकांनी संतप्त होत आजपर्यंत न झालेले मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले. या आंदोलनात २०० हून अधिक शिक्षक सभासदांनी सहभाग घेतला. मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण आणि तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बँक विकास आघाडीने दिला आहे.