Provide subsidy for nano urea and nano DAP fertilizers : खासदार अनुप धोत्रे यांची मागणी, संसदेत उपस्थित केला प्रश्न
Akola पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” या संकल्पनेतून देश आत्मनिर्भर भारत घडवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. आता याच पार्श्वभूमीवर, ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि “शेतकरी राजा सुखी तर देश सुखी” ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी खतांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. या खतांना अनुदान (सबसिडी) देण्यात यावे, अशी मागणी खासदार अनुप धोत्रे यांनी संसदेत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून केली.
भारतातील कृषी क्षेत्र देशाच्या GDP मध्ये महत्त्वपूर्ण योगदान देते. नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी ही पर्यावरणपूरक व पोषणक्षम खते आहेत. त्यांच्या वापरामुळे अत्याधिक रासायनिक खतांचा वापर कमी होतो. मातीचे प्रदूषण रोखता येते आणि शेती उत्पादनात वाढ होते. सरकारने या खतांना अनुदान दिल्यास, शेतकऱ्यांना हवामान-आधारित संवेदनशील शेती पद्धती स्वीकारण्यास प्रोत्साहन मिळेल.
Maharashtra English School Trustees Association : शाळांचे ७० कोटी सरकारवर उधार!
खासदार अनुप धोत्रे यांनी संसदेत विविध मुद्द्यांवर आवाज उठवला आहे. ते संसदेत शंभर टक्के उपस्थिती राखणारे आणि प्रत्येक अधिवेशनात सक्रीय सहभाग नोंदवणारे खासदार म्हणून ओळखले जातात. शेतकऱ्यांचे प्रश्न, विमानतळविषयक समस्या, रेल्वे आणि शिक्षणाशी संबंधित मुद्दे अशा विविध विषयांवर त्यांनी संसदेत मांडणी केली.
Kapshi road Grampanchayat : महिलांच्या सुरक्षेसाठी ग्रामपंचायतने लावले सीसीटीव्ही!
विकासकामांसाठी मंत्र्यांची भेट
खासदार धोत्रे यांनी अलीकडेच अकोला जिल्ह्यातील विकासकामांना गती मिळावी यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली. पातुर-शेगाव आणि अकोला-महान या रस्त्यांच्या चौपदरीकरणासाठी तसेच अकोला रेल्वे स्थानकाच्या नवीन पुलासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन गडकरींनी धोत्रेंना दिले होते. खासदार अनुप धोत्रे यांनी नितीन गडकरी यांच्या कार्यालयात भेट घेऊन विविध विकास प्रकल्पांबाबत चर्चा केली.