Breaking

Chhagan Bhujbal : भुजबळांनी मागणी केली, क्षणात मंजूर झाली!

Lasalgaon depot receives five new buses : लासलगाव डेपोमध्ये ५ नवीन बसेस; येवला डेपोलाही लवकरच मिळणार

Nashik राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. गेल्या काही दिवसांपासून ते यासंदर्भात जाहीरपणे बोलत नसले तरीही मनात खदखद आहेच. अशात त्यांनी एखादी मागणी केली तर ती क्षणात मंजूर करण्याकडेही सरकारला कल आहे. त्यांच्याच एका मागणीला प्रतिसाद म्हणून लासलगाव डेपोमध्ये ५ नवीन बसेस दाखल झाल्या आहेत. तर येवला डेपोलाही लवकरच नवीन बसेस मिळणार आहेत.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक Pratap Sarnaik यांच्याकडे राज्य परिवहन येवला व लासलगाव आगारास नवीन बसेस देण्याची मागणी भुजबळांनी केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात लासलगाव बस डेपोला ५ बसेस प्राप्त झाल्या आहेत. तर येवला डेपोला देखील लवकरच बसेस प्राप्त होणार आहे. येवला मतदारसंघातील रा.प. येवला व लासलगाव या दोन्ही आगारांमध्ये बसेसचा तुटवडा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात तक्रारी होत होत्या.

Anup Dhotre : नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी खतांना अनुदान द्या

येवला आगारात कोरोना प्रादुर्भावापूर्वी प्रवाशांच्या सेवेसाठी ५२ एस.टी. बसेस होत्या. त्यामुळे येवला तालुक्यातील सर्व गावांना वेळेवर बसेस मिळत होत्या. मात्र सद्यस्थितीत फक्त ३५ बसेसच उपलब्ध असून त्यातील सुद्धा दोन बसेस नादुरुस्त असतात. म्हणजेच केवळ ३२/३३ बसेसमध्ये काम भागवले जात आहे. कोरोना काळानंतर २२ बसेस स्क्रॅप झाल्या आहे. मात्र एकही नवीन बस न मिळाल्याने आगारातील बसेस कमी झाल्या आहेत.

Maharashtra English School Trustees Association : शाळांचे ७० कोटी सरकारवर उधार!

त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील बऱ्याच गावांच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत व काही गावांना जाणाऱ्या बसेस बंद झाल्याने ग्रामीण भागातील प्रवासी विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांची व ज्येष्ठ नागरिकांची प्रवासासाठी मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे येवला आगारास किमान २५ नवीन एस.टी. बसेसची आवश्यकता आहे.