Breaking

Birth Certificate Fraud : किरीट सोमय्या यांना पोलिसांनी काय माहिती दिली?

 

Letter from the Superintendent of Police to Kirit Somaiya : बनावट कागदपत्रांद्वारे जन्म दाखल्यांचे प्रकरण; पोलीस अधिक्षकांचे पत्र

Akola बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्रे मिळवल्याचा गंभीर प्रकार राज्यात उघडकीस आला आहे. जिल्ह्यातील विविध सात पोलीस ठाण्यांत अशा प्रकारचे ५२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या संदर्भात १९ मार्च रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांना पत्राद्वारे माहिती दिली.

जिल्ह्यात १५,८४५ जन्म प्रमाणपत्रे उशिराने जारी करण्यात आली आहेत. यातील काही प्रकरणांत संबंधितांनी बनावट कागदपत्रे सादर करून प्रमाणपत्र मिळवल्याचे तपासात उघड झाले आहे. महसूल विभागाने या संदर्भात चौकशी करताना संबंधित व्यक्तींची पडताळणी केली आहे. शाळेच्या दाखल्यांमध्ये फेरफार आणि कागदपत्रांमध्ये खोडतोड केल्याचे आढळले आहे.

Kirit Somaiya : अकोल्यात मोठा घोटाळा; बांग्लादेशी-रोहिंग्यांना असे दिले नागरिकत्व !

जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ च्या कलम १३ (३) नुसार चुकीची कागदपत्रे सादर करून प्रमाणपत्र मिळवल्याच्या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अकोला शहरात सर्वाधिक २३ आरोपी निष्पन्न झाले आहे. इतर तालुक्यांमध्येही गुन्हे दाखल झाले आहेत.

अकोला शहर – २३ आरोपी (१ गुन्हा), मूर्तिजापूर – २ आरोपी (२ गुन्हे), बार्शीटाकळी – १२ आरोपी (३ गुन्हे), पातूर – ५ आरोपी (१ गुन्हा), अकोट – ९ आरोपी (१ गुन्हा), तेल्हारा – १ आरोपी (१ गुन्हा) असे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

Kirit Somaiya : दोन लाख बांग्लादेशींना भारतीय नागरिक बनविण्याचे षडयंत्र!

पोलीस तपासात २४ आरोपी निष्पन्न झाले असून महसूल विभागाच्या अहवालानुसार ११ आरोपींची नोंद आहे. आतापर्यंत १६ जणांना अटक करण्यात आली आहे. ४१ जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. प्रचलित कायद्यांनुसार कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी स्पष्ट केले आहे.